
धोत्राभंनगोजी.( मन्सूर शहा. ). आज 14 एप्रिल रोजी धोत्राभंनगोजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार, अर्पण करून १३२ वी जयंती साजरी करण्यात आली असून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर १४एप्रिल १८९१ ते डिसेंबर १९५६ हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीतील प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकाविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्यात करण्यात मोठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांचे हक्काचे समर्थन केले.
देशप्रेमा पुढे जाणे स्वतःच्या विश्रांतीचा त्याग
केला.माणसाला स्वाभिमानाने जगणे शिकवले.ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले.असा या आकाशात एकमेव तारा म्हणजे बाबासाहेब होते.डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दूर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला आंबेडकरांनी सतत जातीपातीच्या भेदभावाला संपवण्याकरिता कठोर परिश्रम केले भारतीय समाजात जातीपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या धुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भूमिका बजावली जातीपातीच्या भेदभावामुळे भारतीय समाजाला संपूर्ण विस्कळीत आणि अपंग बनवले होते हे पाहता आंबेडकरांनी दलितांच्या हक्कासाठी लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत बऱ्याच प्रमाणात बदल घडून आणला. या जयंतीनिमित्त सर्व जाती धर्माचे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये उपस्थित होते. उपस्थितीमध्ये, गावातील प्रथम नागरिक सरपंच माननीय गुलाबसिंग रामसिंग सोनारे, उपसरपंच गणेश कुसळकर, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग कापसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण कापसे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सत्यविजय गवई, महाले सर मुख्याध्यापक शाळा धोत्रा भंनगोजी, प्रशांत कापसे, प्रशांत काळे, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच अशोक भोसले, पत्रकार शाम देशमुख, पत्रकार मन्सूर शहा, समाजसेवक गणीभाई, विवेक पवार अमोल निकम, बबन चव्हाण, संजू भाऊ गवई, तसेच सर्व प्रतिष्ठित, नागरिक , व माता भगिनी,उपस्थित होते.
Users Today : 6