डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित/ विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून गोळेगाव ग्रामपंचायत कार्यालय तसेच नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय शामराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न झाले देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय गोळेगाव यांच्या सौजन्याने गणपती नेत्रालय जालना येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. गोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घेण्यात आले या यांच्या नियमावली मध्ये पिवळे रेशन कार्ड धारकांना गणपती नेत्रालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच केसरी रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांची आहे महात्मा फुले व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत डोळ्याच्या विविध आजारावर शस्त्रक्रिया ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य अशा सुविधा नी शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते तसेच शिबिरामध्ये जवळपासच्या ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घेतला .तसेच शिबिरामध्ये 310 महिला व पुरुषांनी नेत्र तपासणी केली .यावेळी उपस्थित माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर डॉ. रामप्रसाद शेळके ,मनोज कायंदे, उद्धव नाना मस्के, रंगनाथ कोल्हे ,एल एम शिंगणे, सरपंच दत्तात्रय शामराव कोल्हे गणपती नेत्रालय डॉ. संतोष नाईक यांची सव॔ टीम सारंगधर कोल्हे, गणेश कोल्हे, दगडूबा हिवाळे, रुक्मिणी हिवाळे, गोदावरी एडके, अलका कोल्हे ,उमा बर्डे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्मचारी वृंद उपस्थित होते

 

0 9 3 7 5 0
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *