अंत्री कोळी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
2 Min Read

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते त्याचप्रमाणे 132 वी जयंती आंत्रिकोळी येथे दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली सकाळी 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर पंचशील घेतली मुख्याध्यापक अपार सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकला तसेच यश गजानन खरात इयत्ता तिसरीतल्या मुलाने भाषण केले त्यानंतर ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले सायंकाळी पाच वाजता मिरवणूक काढण्यात आली प्रतेक घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या या वेळी गावातील लहान मुलांपासून तर अबालवृद्धा पर्यंत तसेच महिला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचा सहभाग होता मिरवणूक काढतेवेळी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले साहेबांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्व गावकऱ्यांना मिरवणूक शांततेत पार पाडा असे आवाहन आठवले साहेब अमोल गवई साहेब यांनी केले समोर मिरवणूक छत्रपती चौक मध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी शिवराजे मित्र मंडळ यांनी फराळाची व्यवस्था केली होती त्या वेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदु कर्‍हाडे,उपस्थितीत होते सदर मिरवणुक शांततेत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून समाज मंदिरामध्ये मिरवणुकीची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन महेंद्र हिवाळे यांनी केले तसेच बंदोबस्ताला आलेले शितोळे साहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आभार प्रदर्शन अनिल हिवाळे यांनी केले बीट जमादार रवींद्र पवार यांनी खोर साकेगाव वाघापूर अंत्रीकोळी या सर्व गावामध्ये शांततेत मिरवणूक शांततेत झाल्या असे सांगितले

 

0 9 3 7 5 0
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *