राहेरी बु येथील अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालयातील तिन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक

Khozmaster
1 Min Read

सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी सुरेश हुसे

तालुक्यातील राहेरी बु येथील अटलबिहारी वाजपेयी विद्यालय,या शाळेत सन २०२२-२३मध्ये राष्ट्रीय विज्ञान आँल्यम्पियड फाऊंडेशन तर्फे परिक्षा घेण्यात आली होती यात २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तीन विद्यार्थ्याना सुवर्णपदक प्राप्त झाली. याबाबत वृत असे की सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय विज्ञान आँल्यम्पियड परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत इयत्ता पहिली ते सहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते गणित ओलंपियाड विषया २०विद्यार्थी व विज्ञान विषयात०४ विद्यार्थी बसले होते. यामध्ये गणित विषयात इयत्ता दुसरी मधील आरव पुजाराम नागरे़. कु संस्कृती श्रीधर चाटे,कु राजलक्ष्मी शरदचंद्र देशमुख या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्राप्त झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेली आहे़़ या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष शशिकांत देशमुख व मुख्याध्यापक अंबादास देशमुख सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व त्यांना स्पर्धेच्या पुढील वाटचाली करता मार्गदर्शन केले

0 9 3 7 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *