शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी…

Khozmaster
2 Min Read

नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : _भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांच्या हितासाठी वाहून दिले. या महामानवाच्या कार्याची तुलना होऊच शकत नाही. आपल्या देशाला संविधानाच्या रूपात एक अमुल्यभेट बाबासाहेबांनी दिली. *१४ एप्रिल* म्हणजेच *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांची *जयंती.* आधुनिक भारताचा पाया रचनाऱ्या या युगपुरुषाची जयंती जगभरामधे मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते._काल दि. १४/०४/२०२३ रोजी *शिवसेना नांदुरा शहराच्या* वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बोधीसत्व डॉ. भीमराव आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व हरार्पण करून अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले, समाजसुधारक भीमराव यांच्या भारतीय समाजातील योगदानाला आदरांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या आदर्शांचे, विचारांचे स्मरण करुन त्यांच्या अमुल्य जीवनावर, विचारांवर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांनी महान तत्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेबांचे विचार, तत्व आत्मसात करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा संकल्प केला._ यावेळी शिवसेना मा. तालुकाप्रमुख रमेश पाटील. अनीलभाऊ जांगळे शिवसेना शहरप्रमुख, सौ सरिताताई बावस्कार महिला आघाडी शहर प्रमुख, सौ.प्रज्ञाताई तांदळे महिला आघाडी उपशहर प्रमुख, संजय मेहसरे शिवसेना उपशहर प्रमुख, जितुभाऊ जुनगडे शिवसेना शहर संघटक,शुभम ढवळे शहर प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष,महादेव सपकाळ शिवसेना उपशहर प्रमुख, जितु मोरे,पवन दुबे.हरीष काटले अजय तिवारी संजय मात्रे,महेश उंबरकर, रविंद्र मात्रे,विठ्ठल इंगळे,प्रकाश बावस्कार, संतोष कंकाळ, पवन जांगळे, किसना इंगळे, सुरज जांगळे आणि शिवसैनिक नांदुरा शहर उपस्थित होते.

 

_____

 

0 9 3 7 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *