खासदार जाधव यांची खेळी : विरोधी पक्षाचा सेनापतीच उडवला..!

Khozmaster
2 Min Read

महाविकास आघाडीचे प्रा. आशिष राहाटे व सतीश ताजने यांचे अर्ज केले नामंजूर..

मेहकर, प्रतिनिधी- मेहकर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देन पत्र छाननीमध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेचे बुलढाणा उपजिल्हाप्रमुख प्रा. अशिष रहाटे कांग्रेसचे सतिश ताजने यांचे निवडणूक नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी मेहकर यांनी मंजूर केले.मात्र प्रा अशिष रहाटे व सतिश ताजने यांच्या नामनिर्देशन पत्राव र विरोधी पॅनलकडून जिल्हा निवडणूक अधिका-याकडे अपील द्वारे हरकत घेतली होती. त्यावर निर्णय देताना जिल्हा निवडणूक अधिका-यांनी प्रा. अशिष रजा व प्रा. सतीष ताज हे शंभर टक्के शाशन अनुदानित शिक्षण संस्वमध्ये कर्मचारी आहेतअसा आशय नमूद केला होता. या कारणावरून या दोन्ही नेत्यांचे नामनिर्देन पत्र नामंजूर करण्यात येत असल्याचा आदेश दिनांक १७ एप्रील २०२३ दिला आहे. ठाकरे गटाचे शिवसेनेचे युवा नेते म्हणून प्रा. अशिष रहाटे यांचे नेतृत्वात नुकताच मेहकर अर्बन बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला. तोच विजयाची परंपरा कायम ठेवण्याचा मानस महाविकास आघाडीचा आहे. सी घोडदौड रोखण्यासाठी खा प्रतापराव जाधव यांनी खेळी खेळली असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. एकंदरीत आपल्या राजकीय सक्षम नेतृत्व आणि अभ्यासाचा वेळ घालून खासदार जाधव यांनी विरोधी गटाचा सेनापती च उडवला अशा प्रकारची चर्चा परिसरात रंगली आहे.आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात प्रतापराव जाधवांनी आपली रणनिती आखली आहे. याबाबत भ्रमणध्वनी वरून युवा नेते प्रा. अशिष रहाटे यांना याविषयी त्यांची प्रतिक्रीया विचारली असता कृउबासमितीची निवडणूक चुरशीची होणार आहे. ठाकरे गटावरील विश्वास लोकांचा दृढ असून, मतदारांचा कौल आमच्या बाजूला आहे. हे सगळं माहित असल्या कारनाणे खासदार जाधव यांनी ही खेळी खेळी आहे. विजय हा सत्याचाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ठाकरे गटाची शिवसेनेची ताकद मतदार संघातात चालली आहे. पराभवाच्या भीतीने माझे नाम निर्देशन अर्जावर हरकत घेवून कृउबास निवडणूकीत मला रोखण्याचा केला जात आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले.

.

 

0 9 3 7 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *