सिंदखेड राजा सुरेश हुसे /डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती दलित बहुजनांच्या मुक्तीची जंयती आहे..ती फक्त भारतात नाही तर जगाच्या कानाकोप-यात मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते.. कारण स्वातंत्र्य, समता ,बंधुता। व न्याय हा मुलमंत्र घेऊन ते आयुष्यभर दिन दुबळ्यासाठी लढत होते.. युरोपातील आदिवासी तर ‘जयभीम नेटवर्क ‘ नावाची संघटना चालवतात..आज जयभीम हा शब्द चळवळीचा “पासवर्ड ” झाला आहे..संविधान बाबासाहेबांनी लिहले हे खरे असले तरी ते जनतेला अर्पण केले आहे.ते आपले घर आहे आपल्या सर्वांना ते माहीत असले पाहिजे..शाळा महाविद्यालयात संविधान उद्देशिका पुरते मर्यादित न राहता सिलँबसमध्ये त्याचा समावेश असला पाहिजे.. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार सर्व सामान्यापर्यतं पोहचत आहेत पोहचले आहेत परंतु फोटोला हार आणि विचाराला कुलुप हा महापुरषाला संपविण्याचा नवा फंडा देशात सुरु झालाआहे..तो वेळीच थांबवता आला पाहिजे..असे विचार चोखासागर नामकरणाचे प्रणेते विचारवंत प्रा.कमलेश खिल्लारे यांनी “सायाळा” येथे आंबेडकर जंयती निमित्त व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांवाचे सरपंच लंबे हे होते तर प्रमुख अतिथी बुलढाणा अनिस अध्यक्ष प्रदिप हिवाळे, नाट्य कलावंत महेंद्र खिल्लारे, अर्बन पतसंस्था अध्यक्ष निलेश बंगाळे हे उपस्थित होते……कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आला.. पाहुण्यांच्या स्वागता नतंर शरद सरकटे यांनी प्रास्ताविक करताना आमच्या गावातील हा प्रबोधनाचा पहिला कार्यक्रम आहे.भरपूर दिवसाच पोट खाली आहे असे सांगितले. प्रदिप हिवाळे यांनी महापुरुष वाचले पाहिजे तेव्हा आचरणात आणता येतील आणि आपलं जीवन सुधरेल असं सांगितले.. नाट्य कलावंत महेंद्र खिल्लारे यांनी आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार काळजीपूर्वक वापरला पाहिजे.तो विकला नाही पाहिजे तेव्हाच आपण चांगले उमेदवार निवडून देउ असे सांगितले.. निलेश बंगाळे यांनी माणसात बदल होतात त्यासाठी वाचन आणि चांगल्या लोकांचा सहवास असला पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप सरकटे यांनी तर आभार प्रदर्शन माधवराव सरकटे यांनी केले.या वेळी महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम टायगर फोर्स ने परिश्रम घेतले…..
Users Today : 9