सी .बी. एस.ई च्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक डॉ. रामप्रसाद शेळके

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित

देऊळगाव राजा तालुक्यात तसेच जिल्ह्यामध्ये सी.बी.एस. ई च्या नावाखाली बऱ्याच शाळांनी जनतेची फसवणूक करत कुठल्याही प्रकारची परवानगी तसेच कुठलीही मान्यता नसताना जनतेला खोटं सांगून ही आमच्याकडे सीबीएसई मान्यता आहे परंतु वास्तव्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सीबीएसई सलग्नता असलेल्या फक्त 24 शाळा आहे त्यापैकी सिंदखेडराजा देऊळगाव राजा तालुक्यात राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ही एकमेव सी बी एस ई सलग्नता प्राप्त असलेली स्कूल आहे .मागील काही दिवसापासून राज्य सरकारकडून बोगस शाळा तपासणी मोहीम चालू आहे .देऊळगाव राजा तालुक्यात असे निदर्शनास आले की सी. बी. एस. ई बोर्डाची मान्यता नसताना ज्या ठिकाणी त्या शाळांना परवानगी दिलेली आहे परंतु त्या ठिकाणी त्या शाळा न चालवता इतर ठिकाणी चालवल्या जात आहे असे असताना देखील याकडे शिक्षण विभाग डोळे झाक पणाचे ढोंग घेत आहे .देऊळगांवराजा शहरातील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यतिरिक्त कोणत्याही शाळेला सी बी एस ई बोर्डाची मान्यता नसून इतर शाळांना स्टेट बोर्ड महाराष्ट्र शासनाची परवानगी आहे देऊळगाव मही येथील तसेच देऊळगाव राजा येथील मान्यता आहे परंतु पालकांना या शाळा सी. बी. एस. ई बोर्डाची परवानगी आहे असे सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे. परंतु निदर्शनास आले की एका शाळेची परवानगी जांभोरा परिसरात आहे परंतु देऊळगाव राजा येथे चालवत आहे एका शाळेची सावखेड भोई येथील पत्त्यावर परवानगी आहे. व ती सुद्धा देऊळगाव राजा परिसरात आहे. परंतु असे निदर्शनास आलेल्या महाराष्ट्र शासनाचा आदेश डावलून असे राजरोसपणे चालू आहे यावर आठ दिवसांमध्ये कारवाई ज्या माध्यमाच्या शाळा आहेत व ज्या ठिकाणी त्यांची परवानगी दिलेली आहे त्याच ठिकाणी त्या शाळांना चालविण्यास परवानगी द्यावी तसेच वाढदिवसांमध्ये या विषयावर न्याय नाही मिळाला तर शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी दिला आहे.

 

0 9 3 7 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *