रमजान: रायपूर पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी; सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा : सचिन कदम

Khozmaster
2 Min Read

सादिक शाह /रायपूर.येथील पोलिस ठाण्यात रमजानच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, शांतता समिती अध्यक्ष बाहेती काका सरपंच पती सुनील देशमाने व सर्व ग्रा प सदस्य. मो एजाज फारुख सौदागर नंदू बापू देशमुख मा पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर साबीर मुजावर खालील मुजावर शमीम सौदागर शेख शोएब जाबिर खान सादिक शाह प्रकाश खंडागळे समाधान पाटील नुमान खान जावेद शाह अफसर् हाजी बलदेव लहाने सादिक कुरेशी मुज्जू हजीसाब शाहिद मास्तर साजिद टेलोर शेख अकील हाजी मुश्ताक मुजावर व पंच क्रोशितील सर्व नागरिक यांच्यासह गावातील विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी बांधव व सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व सार्वजनिक सण-उत्सव आणि कार्यक्रमावर प्रतिबंध होता. परंतू यावर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व नियम शिथिल झाल्यामुळे, रायपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी एसडीपीओ सचिन कदम म्हणाले की, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांनी सर्व समाजाने एकमेकांच्या सणात आनंदाने सहभागी होऊन एकोप्याचे दर्शन घडवावे असे सांगितले. आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

 

 

 

0 9 3 7 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *