महेंद्र हिवाळे चिखली /तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी चिखली तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेताच आपल्या कामांचा धडाका सुरू केलाय .. नागरिकांची कामे आता सुटीच्या दिवशी सुद्धा होत असून कोणाला ही गरज पडल्यास थेट त्यांच्या मोबाईल वर संपर्क करावा , असे आवाहन ही तहसीलदार सुरेश कव्हाळे यांनी केलेय..चिखली तहसीलदार कव्हळे यांनी प्रशासकीय कामाबरोबरच तहसील परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय.. सोबतच नागरिकांना पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करू दिलीय.. नागरिकांना वाचनासाठी पुस्तके आणि वृत्तपत्रांची सुद्धां व्यवस्था केलीय.. तहसील आवारात झाडांसाठी कुंड्या ठेवल्या आहेत … एव्हढेच नव्हे तर सुटीच्या दिवशी ज्या नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना काही कागदपत्र किंवा दाखले लागत असतील त्यांना आता सुटीच्या दिवशी सुद्धा दाखले देण्याचा उप्रकम हाती घेतलाय .. तस त्यांनी एक सूच्णापत्र तहसीलच्या भिंतीवर लावले असून नागरिकांना आवाहन सुद्धा केलेय.. शिवाय जर कार्यालयातील कर्मचारी ऐकत नसेल तर त्यांनी आपला खाजगी मोबाईल नंबर सुद्धा नागरिकांसाठी त्या फलकावर दिलाय.. त्यामुळे आता नागरिकांना भविष्य्यात कोणत्याही कामासाठी अडचण येणार नाही.. या उपक्रमांसोबतच तहसीलदार यांनी राज्यशासन ने सुरू केलेल्या सलोखा योजनेचा शुभारंभ केलाय, राज्यातील पहिला दस्त नोंदणी करून इतिहास केलाय.. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता गट बदलीसाठी दोन लाख रुपये खर्च करण्याचे काम नसून ते काम फक्त दोन हजारात होणार आहे .. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद आता संपुष्टात येतील , एव्हढे मात्र निश्चित .. तहसीलदार सुरेश काव्हाळे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ..
Users Today : 9