सावळदबारा येथील राहीन मो.आज्जर व सबा मो.फिरोज दोन मुलीनी ठेवला पहिला रोजा

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील माजी सरपंच मो.लुखमान मो.शरीफ यांच्या दोन नातीनी ठेवला पहिला रोजा इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात रोजाला विशेष महत्त्व आहे.या महिन्यात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वच पहाटे सहेरी करुन रोजा (उपवास ठेवतात) सावळदबारा गावातील आठ वर्ष राहीन आज्जर व सबा मो.फिरोज आठ वर्षांच्या दोन चिमुकल्यांनी अवघ्या आठ वर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा दि.१७/४/३/२३ सोमवार रोजी 

पूर्ण केला. विशेष म्हणजे या वर्षी रमजान महिना मार्च- एप्रिल महिन्यात कडक उन्हात आला आहे. या तळपत्या उन्हात या चिमुरड्याने मुलीने रोजा ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. रखरखत्या उन्हात पवित्र रमजान बद्दल असणारी प्रबल ईच्छा शक्तीच्या जोरावर दिवशभरात अन्नाचा एकही कण न खाता व पाण्याच्या घोट न पिता जवळपास दिवसाचे चौदा तास उपाशी राहून दोन चिमुकल्या सबा मो.फिरोज व राहीन मो.आज्जर ने पहाटे चार वाजता उठून आपल्या कुटुंबियांसोबत सहेरी केली होती. मार्च महिन्याचे कडक ऊन अशात दिवसभर अन्न पाण्या शिवाय हा रोजा त्यानी ठेवला होता.

 

0 9 3 7 5 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *