गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे भारतरत्न डॉ. – बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १३२ वी जयंती दि.१६/४/२३ रविवार रोजी मोठ्या थाटामाटात भीमसैनिक यांच्या हस्ते काढण्यात ऊ.या मिरवणुकीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था मंडळाच्या वतीने तैलचित्र देखाव्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.मित्र मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले व नंतर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गावात निळ्या पताका व ध्वज लावून चौक सजविण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यासाठी महिला व भिमसैनिक यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली, पांढरे शुभ्र वस्त्र महिलांनी परिधान करून रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत लाठी काठी, लेझीम पथकाने,डिजेने लक्ष वेधून घेतले होते. गावात चौका चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे नागरिकांनी पुजन करून पुष्पहार अर्पण केले.मिरवणूक सांयकाळच्या वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सुंदर सजवलेल्या भव्य रथामधून मनमोहक सजावट करुन यथाच्या समोर ढोल ताशे या वाद्यांच्या तालावर एकच नारा”जगात गाजा वाजा भिमराव एकच राजा “या गितावर लहान थोरासह तसेच महीलांनी आनंदाने थिरकत व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी मोलखेडा नगरी दुमदुमून गेली होती.अश्या प्रकारे या आनंदात सामारोप रात्री आठ वाजता करण्यात आला.याप्रसंगी योगेश जाधव यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्धवंदना घेऊन थोडक्यात माहिती दिली.यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि भरत मोरे फर्दापूर,आनंद पगारे,व बिट जमादार मिरखाॉ तडवी, शिवदास गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.याप्रसंगी सरपंचपती ज्ञानेश्वर वारंगणे, अर्जुन जाधव, योगेश जाधव, दिपक जाधव, गणेश जाधव, सिद्धांर्थ जाधव, साहेबराव इंगळे, कैलास सुरडकर, विलास सुरडकर, रमेश इंगळे, गौतम तायडे,प्रकाश तायडे,सुर्यभान जाधव,भारत जाधव, प्रभाकर जाधव, सुखदेव जाधव, मंगळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य,भिमसैनिक, सरपंच, उपसरपंच, मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती मंडळाचे सदस्य योगेश जाधव यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 14