अनअधिकृत बांधकाम केले शाळेला थोटावला नगरपरिषद ने दंड

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा

शहरामध्ये अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून शिक्षण विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शहरातील अशाच अनधिकृत शाळेने विनापरवाना काम केले. असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने संबंधित शाळेला दंड थोटावला आहे.

सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून जिल्ह्या सह मराठवाड्यातील भागाला एक वेगळी ओळख आहे. याचाच फायदा घेत शिक्षण सम्राटाने शासनाकडून ग्रामीण भागात मान्यता घेऊन आपल्या शाळा ह्या शहरात सुरू केल्याने शिक्षणाचे अक्षरशा बाजारीकरण होताना दिसत आहे. तसाच एक प्रकार उत्तमराव घोंगे पाटील शैक्षणिक संस्था बामखेड या संस्थेला तालुक्यातील जांभोरा येथील मान्यता मिळाली परंतु संबंधित संस्थाचालकाने तसे न करता आपली शाळा शहरातील बायपास नजीक सुरू केली. एवढ्यावरही संस्थाचालक थांबला नसून त्याने अनधिकृत शाळेचे बांधकाम करताना संस्था चालकाने चक्क नगर परिषद च्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम करून कळस गाठला यावर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करत संबंधी संस्था चालकाला आर्थिक दंड थोटावला आहे. यासंदर्भात शहरातील चंद्रभान झिने पत्रकार तसेच पत्रकार दत्ता हांडे यांनी नगरपालिकेला 21 एप्रिल रोजी लेखी स्वरुपात निवेदन देऊन तीन दिवसात अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी विनंती केली आहे. व बांधकाम न काढल्यास उपोषणाचा इशारा संबंधितांनी दिला आहे.

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *