ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करावी

Khozmaster
1 Min Read

आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख सेनगाव यांच्या कडुन रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे त्यामुळे संबंधित प्रकारची चौकशी करून कारवाई करावी अशे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

 

 

सविस्तर माहिती अशी की सेनगाव तालुक्यामध्ये मातोश्री पांदन रस्ते तसेच इतर पांदन रस्ते कार्यारंभ आदेशानुसार वेगवेगळया ग्रामपंचायत अंतर्गत कामे चालू आहेत

हि कामे नियम बाह्य चालू असून सदरील कामांमध्ये जे.सी.बी.द्वारे कामे करुन आत्ता बोगसमजूर दाखवून प्रशासनाची दिशाभूल करून शासनाच्या निधीचा विनियोग केला जात आहे.त्यामुळे संबंधित रोजगार सेवक तसेच तांत्रिक अभियंता तसेच ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून संबंधित संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करावी ही विनंती

पांदन रस्ता चालू असल्याचे दाखवून त्या ठिकाणी जे.सी.बी.द्वारे झालेल्या कामावर मजूर उभे टाकुन फोटो काढत आहेत त्या मजुराकडे कुठलेच साहित्य सामग्री उपलब्ध नाही.खोरे टोपले तिकास.अशे साहित्य सामग्री उपलब्ध नसताना रोजगार सेवक तसेच तांत्रिक अभियंता तसेच ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी संगनमताने प्रशासनाची दिशाभूल करून शासनाच्या निधीचा अपहार केला आहे.त्या मुळे प्रशासनाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या सर्व फोटोची शहानिशा करून संबंधित जोशींवर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच संबंधितांकडून शासनाची अपहार झालेली रक्कम तात्काळ वसूल करावी असा इशारा आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख बालाजी देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे

 

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *