शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद /साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळ मांडणीतील गतवर्षी वर्तवण्यात आलेले भाकित बहुतांश खरे ठरल्याने यावर्षी या मांडणी विषयी शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा उंचावल्या आहेत त्यामुळे ह्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी घट मांडणी असून या घट मांडणीला जिल्हा व जिल्हा बाहेरून हजारो शेतकरी उपस्थित राहतील असा अंदाज आहे सध्या जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या भकिताकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून असतात पंजाब डख वर्षभर साधारणतः हवामान अंदाज वर्तवित असतात आणि त्यांचे अंदाज सुद्धा सातत्याने खरे ठरत आहेत परंतु भेंडवळच्या मांडणीला प्राचीन परंपरा असून या मांडणीतून पीक पाण्याचा अंदाज आरोग्य विषयक अंदाज राजकीय अंदाज वर्तुवला जात असल्याने या मांडणीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे यावर्षी पाऊस कशा स्वरूपाचा असेल कोणती पिके चांगली येतील कोणती पिके हानिकारक राहतील रोगराई कशी राहील राजा कायम राहील की नाही असे संपूर्ण अंदाज या मांडणीतून वर्तवण्यात येत असतात पर्जन्य कृषी विषयक तसेच राजकीय भाकीत वर्तवणारी साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची मांडणी 22 एप्रिल शनिवार अक्षय तृतीयेला माडण्यात येणार असून माडलेल्या घाटामध्ये झालेल्या नैसर्गिक बदलांचा सूक्ष्म निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी वर्षभराचे भाकित वर्तविण्यात येणार आहे याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा साधारणतः शेती विषयक पीक प्रजन्यमान व राजकीय तथा काही नैसर्गिक आपत्ती घडामोडी यांचा वेध घेण्याकरता कोणतीही साधन नव्हते तेव्हा उत्सुकतेचून भेंडवळ येथील वाघ परिवारातील अध्यात्मिक श्री रामचंद्र महाराज यांनी त्या काळात प्रचंड तपश्चर्या करून काळाच्या उदरात काय घडले आहे याचा वेध घेण्याचा अनेक वर्षाचे तपश्चिरे नंतर निळावंती विद्या अवगत केली पशु पक्षाचे वर्तन व त्यांचे बोली यांचा वर्षभर व विविध नक्षत्रामध्ये घडणारे नैसर्गिक बदल याचा सुषमा व सकल अभ्यास करून सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी श्री रामचंद्र महाराज वाघ यांनीही ऐतिहासिक घट मांडणी सुरू केली तेव्हापासून वाघ कुळातील वंशज व्यक्ती परंपरागत खरतर साधना करीत अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी विधी पूर्वक या घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्याचे सुष्म निरीक्षण करून भाकित वर्तवित असतात आज पर्यंत अनेक राजकीय व नैसर्गिक उलथा पालक करणारी भाकित प्रत्यक्षात खरे ठरल्यामुळे या माडनिवरचा विश्वास दृढ होत आहे
Users Today : 16