समेळगाव गोविंदा पथक आयोजित
समेळगाव प्रीमियर लीग (एसपीएल) क्रिकेट स्पर्धा २०२३ चा खेळाडू लिलाव कार्यक्रमाचे उद्घाटन आज शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते झाले व टी शर्ट चे अनावरण यावेळी त्यांचा हस्ते करण्यात आले.समेळगाव प्रीमियर लीग स्पर्धेत खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि तेवढ्याच जिद्दीने दरवर्षी खेळत असतात.या क्रिकेट स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. आजच्या युगात मैदानी खेळाचे महत्त्व वाढविण्याची गरज असून, समेळगाव गोविंदा पथक दरवर्षी पुढाकार घेऊन विविध स्पर्धांचे आयोजन करते. हि समाधानाची बाब आहे. तरूणांमध्ये एकोपा निर्माण व्हावा खेळाची जिद्द निर्माण व्हावी आणि त्याच खे॓ळाच्या बळावर त्यांनी भविष्यात आपला खेळ दाखवुन जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर खेळता यावे यासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून खेळाडुना संधी निर्माण करण्याचे समेळगाव गोविंदा पथक करत असते.खेळाडुंवर हजारो रूपयांची बोली लावण्यात येत असुन संघमालक आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ करत असते गेल्या दोन वर्षापासून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आयोजकांचे कौतुक करून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना भविष्यात रणजी चषक क्रिकेट स्पर्धेसह राज्य व देश पातळीवर तसेच भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी नक्की मिळेल व हे खेळाडू नालासोपारा शहराचे नावलौकिक वाढवतील, अशी अपेक्षा महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी व्यक्त केली. समेळगाव गोविंदा पथकचे पदाधिकारी, क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 16