रात्रीच्या अवकाळी पावसाचा खामगाव तालुक्याला फटका!

Khozmaster
1 Min Read

उडाली, वीज पडून दोन बैल मृत्युमुखी, उरलेसुरले कांदा पीक मातीत..!

बुलडाणा : ( खोज मास्टर) अकील शाह/रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडांसह पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांचे पिके जमिनदोस्त केली आहेत. २५ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडांसह खामगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. बोरी अडगाव येथे वीज पडून दोन बैल मृत्युमुखी पडले. आंबेटाकळी येथे श्री संत नारायण महाराज विद्यालय येथील काही खोल्यावरील टीनपत्रे जोराच्या वाऱ्याने उडाली आहेत. बोरी अडगाव येथे एका शेतात मुरलीधर विठोबा हटकर राहिवरखेड यांची बैल जोडी शेतात बैलगाडीला बांधलेली होती. याचवेळी त्या बैलांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.शेतकऱ्यांचा काढणीला आलेला कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेटाकळी येथील शाळेच्या भिंतीला जोराच्या वाऱ्याने तडे जाऊन लोखंडी अँगल सह टिनपत्रे उडाले त्यामुळे शाळेतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *