बुलडाणा 🙁 खोज मास्टर) अकील शाह /बुलढाणा एसटी बस व कटेनरनमध्ये अपघात झाला आहे. या मध्ये कटेनर ट्रक एसटी बसला धडक दिली आहे. दि २६ एप्रिल रोजी येळगाव फाट्यानजीक कटेनरने कट मारल्यामुळे बसचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रक कंटेनरची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाने रस्त्याखाली बस टाकली आणि झाडाला अपघात झाला.धडकून बसचा या अपघातात बसमधील १९ किरकोळ जखमी झाल्याची प्रवासी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीत हानि झाली नाही, ऑन द स्पॉट मिळालेल्या माहितीनुसार मेहकर डेपोची बस (एमएच ०६ एस ८८१४) संध्याकाळी ५.१५ वाजेच्या बुलढाण्याहून सुमारास मेहकरला रवाना झाली. येळगांव फाट्यानजीक बुलढाणा अर्बनच्या वेदशाळेजवळ समोरून भरधाव वेगाने कटेनर (पीबी १३ बीसी (१३५८) हाआला. तो बसला धडक दिली. हे लक्षात आल्यामुळे बसचालक मधुकर अनंत शिरलोढे यांनी तत्काळ बसचे स्टेअरिंग वळविले आणि बस थेट बाजूला छोट्या खड्ड्यात शिरली. समोरच झाड होते. झाडाला बस धडकली आणि थांबली. या अपघातात मात्र बसमधील १९ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. बस कंडक्टर शि. के. मुळे यांच्या उजव्या हाताला मार लागला आहे. इकडे अपघात झाल्याचे लक्षात आल्यामुळे कटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. इकडे जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या जखमी प्रवासींचा उपचार सुरु आहे..
Users Today : 16