तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे/ आयबीपीएस एएफओ परीक्षेत उत्तीर्ण होऊन बँकेमध्ये कृषी अधिकारी पदासाठी निवड झालेले समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी राम दिगांबर बोरकर व सुशील धर्मदीप वानखडे यांचा समर्थ कृषी महाविद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. या प्रसंगा वेळी प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे यांच्या हस्ते राम बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष देवानंद कायंदे, सचिव नंदाताई कायंदे, संचालक मनोज कायंदे, सदस्य सतीश कायंदे यांनी सुध्दा अभिनंदन केले. यावेळी राम बोरकर यांनी आपल्या यशासाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली. आपल्या यशासाठी शेतकरी असलेले वडील दिगांबर बोरकर व समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी केलेल्या सहकार्याला उजाळा दिला व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले तसेच पुढील परीक्षेची तयारी देखील याच मार्गाने करून यश मिळवण्याचा मानस देखील व्यक्त केला. या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे प्रा. अश्विनी जाधव, प्रा. लिकेश मेश्राम आणि प्रा. अरविंद देशमाने तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Users Today : 16