देवेंद्र सिरसाट.
(दै, खोजमास्टर)
नागपूर.
संपूर्ण विश्वाला दया, क्षमा, शांती ची शिकवण देणारे विश्व वंदनीय तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त, हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीच्या वतीने बौध्द हक्क परीषद हिंगणा येथे तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन सामुहिक बुध्दवंदनेसह अभिवादन करण्यात आले उपस्थितीत बौध्द उपासक, उपासीका यांनी बुध्दाचे तत्वज्ञान अंगीकृत करुन आपल्या परीवारासह संपूर्ण मानव कल्याणासाठी त्याच्या प्रचार प्रसार करण्याचा संकल्प केला, हिंगणा तालुका संयुक्त बुध्दविहार समितीचे संपर्क प्रमुख महेश वासनिक यांनी महामानवांना अभिवादन करुन उपस्थित तथा तालुक्यातील सर्व नागरिकांना बुध्दजयंतीच्या मंगलकामना व शुभेच्छा दिल्या प्रसंगी समिती संचालक पुंडलिक धवने, प्रशांत दिवे, विजय मेश्राम, निलवर्धन वासनिक, विमल पुनवटकर, तनुजा झिल्पे, अर्चना मेश्राम, उज्वला पुनवटकर, बौध्द समाज एकता परिषदेचे अध्यक्ष सुरेश मानवटकर, बंडू वानखेडे, अरुण भगत, नरेश सोमकुवर, राजू गायकवाड, भिमराव फुलझेले, बौध्द हक्क परिषदेचे अध्यक्ष नामदेव भगत, सचिव तेजराव मुन, भिमराव मोडक, फुलचंद शेलकर, सुरेश डांगे, बंडू चांदेकर, पुरुषोत्तम तेलंग यासह परीसरातील बंधू भगिनी उपस्थित होते.