सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.५/५/२३ शुक्रवार रोजी अनंत कोटी विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या गावात पादुका पूजन व पालखी सोहळा आणि प्रवचन जगद्गुरु शंकराचार्य भक्त श्री नरेंद्र स्वामी महाराज यांच्या दिंडी सोहळा व प्रतिमापूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी श्री सद्गुरु देव अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेचे श्रीक्षेत्र सावळदबारा येथील व पंचक्रोशीतील बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील अनेक भक्तगण उपस्थित होते याप्रसंगी जीवनामध्ये आचार विचार व सद्गुण चांगले असले तरच माणसाचा विकास होऊ शकतो त्यासाठी जगा व जगू द्या हा उपदेश सद्गुरूंनी जगाला दिला आहे शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने जगाला शांतीचा संदेश देणारे सद्गुरु श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली याप्रसंगी अनेक भक्त मन उपस्थित होते संपूर्ण श्री क्षेत्र सावलदबारा गावांमध्ये पायी दिंडी काढून पालखी मिरवणूक काढण्यात आली स्वामींची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून गावामध्ये सडा, रांगोळ्या टाकून पालखींचे दिमागदार सोहळा पार पडला यावेळेस गावातील भक्तजन मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे सर्व युवा या कार्यक्रमांमध्ये भगवा ध्वज घेऊन उपस्थित होते प्रत्येकाने संग्राम सेनेची भगवी साडी व भगवा आत्तापर्यंत करून एकंदरीत भगवे मे वातावरण झाले होते अशा या कार्यक्रमाची सांगता हरिहर मंदिर सावलडबारा येथील महाप्रसादाचा लाभ घेऊन झाली यावेळेस गावातील सर्व भक्तगण उपस्थित होते.यावेळी प्रा.जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते, भोकरे सर शांताराम खराटे समाधान गायकवाड, पिटु नरोटे सुभाष टीकारे विठ्ठल गायकवाड ,कुंडलिक काळे,टिटवी,डाभा, देव्हारी, मोलखेडा, येथील समस्त भक्तगण व वारकरी संप्रदायाचे श्री क्षेत्र सावळदबारा येथील हभप.वासुदेव महाराज खडके, हभप.आबाराव महाराज कोलते, हभप.भागवत महाराज महाजन, सुनील राजपूत, गजानन सुरपाटणे, पंढरी सपाटे, आकाश कळस्कर, शैलेश जयस्वाल,सोपान मानकर, हरी भांबेरे, हरी साबळे, हभप.विशाल महाराज खडके इत्यादी वारकरी उपस्थित होते अशी सविस्तर माहिती प्राध्यापक जीवन कोलते सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली
Users Today : 16