प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापुर ता,०५
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या “बुद्ध पौर्णिमा” निमित जेतवन बुद्ध विहार ,दुर्गावाडी मित्र परिवार व शहरातील विविध ठिकाणच्या मित्र मन्डळ यानी एकत्र येऊन भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली,या मिरवणूकी दरम्यान आ,रमेश पा, बोरनारे,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यानी प्रतिमा पूजन करुन भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केले शहरातील मुख्य रस्त्यावरुन ही मिरवणूक जेतवन बुद्ध विहार येथे समाप्त झाली,या ठिकाणी धोंडीरामसिंह राजपूत यानी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थित साधक-सधिका याना मार्गदर्शन केले या समयी प्रमूख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख यांची होती,सुत्रसंचालन व प्रास्ताविक अशोक पगारे व सुनिल त्रिभुवन यानी केले,एच , आर,भुईगळ,यांनी वंदना म्हटली,या नंतर खिरदान,व अन्नदान कार्यक्रम ही झाला,या प्रसंगी एम,आर,,गणवीर,प्रा,प्रमोद पठारे,से,नि,प्राध्यापक
डि,एस,गायकवाड,साहेबराव पडवळ,विलास त्रिभुवन,हरीभाऊ बागुल,राजेश गायकवाड,विशाल शिंदे,तांबुस आप्पा,कोसे आप्पा,विलास,म्हस्के,श्री दिवेकर,दीपक त्रिभुवन,किरण त्रिभुवन,व बौध्द ऊपा-सक,उपसिका मोठ्या सन्खेने उपस्थित होत्या,(फोटो-भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला अभिवादन करताना धोंडीरामसिंह राजपूत,शेख अखिल,भुइन्गल
अशोक पगारे,सुनिल त्रिभुवन,राजेश गायकवाड, व ईतर)
Users Today : 17