सीएस डॉक्टर साबळे यांचे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात सर्जिकल स्ट्राइक अस्वच्छता पाहून हातात घेतला झाडू तर गैरहजर डॉक्टरांचे पगार केले कपात

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

पाटोदा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टर साबळे यांनी अचानक भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली यावेळी रुग्णालयामध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आल्याने स्वतः बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी हातामध्ये झाडू घेऊन

रुग्णालय स्वच्छता केली बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे आल्या पासून बीडच्या आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला पाहिला मिळत आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे स्वतः ग्राउंड वर जाऊन रुग्णांच्या अडचणी सोडविण्याचे प्रमाणिक पणे प्रयत्न करत असतात पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची ऑन द स्पॉट पाहणी करताना तेथील अस्वच्छता आढळून आल्यामुळे तात्काळ हातात झाडू घेऊन सर्व स्टाफ नर्स कर्मचारी यांना सोबत घेऊन स्वच्छता करून घेत नंतर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे धडे दिले आपल्या घराची जशी काळजी घेतो तशी रुग्णालयांची काळजी घ्या रुग्णालय म्हणजे आपले घर समजून स्वच्छता ठेवत जा अशा सूचना करून दांडी बहादर कर्मचाऱ्यांना फोनवरून चांगलेच झापुन दांडी बहाद्दर डॉक्टर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे पगार कपात करुन पुन्हा असे निदर्शनास आले तर कायदेशीर कारवाई करणार असा धमकी वजा प्रेमाचा इशारा दिला डॉक्टर साबळे यांच्या अचानक सर्जिकल स्ट्राइकने मात्र पाटोदा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ पाहण्यास मिळाली तसेच पत्रकार करांना बोलताना डॉक्टर साबळे म्हणाले यापुढे अशा सरप्राईज भेटी देत जाऊ यांने रुग्णालयाची ही स्वच्छता राहते व रुग्णालयातील रुग्णांनाही चांगली सेवा मिळते तसेच ग्रामीण रुग्णालयातील अडचणी जाणून घेत लवकरच पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील सर्व सेवा सुरळीत करू असा शब्द डॉक्टर सुरेश साबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाk

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *