पालकांनी खेळाडूंना उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्याकरीता प्रोत्साहीत करावे..

Khozmaster
3 Min Read

बुलडाणा 🙁 खोज मास्टर ) अकील शाह

बुलडाणा क्रीडा प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनातुन खेळाडूंनी खेळ संस्कृती जोपासुन, योग्य खेळ निवडून नित्य सराव केल्यास बुलढाणा जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू जिल्ह्यामध्ये नाव लौकीक करतील व त्यांना खेळाची आवड निर्माण होईल या दृष्टीने पालकांनी आपल्या पाल्यांना क्रीडा विभागाचे वतीने सुरु असलेल्या उन्हाळी क्रीडा व व्यक्तीमत्व विकास शिबीरात पाठवावे असे शिबीरात मार्गदर्शन करतांना मा. श्री. गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांनी सांगीतले. शरीराच्या शारीरिक, मानसिक व बौध्दीक प्रगतीसाठी खेळासारखा कोणताच पर्याय नाही. तसेच खेळाडूंना ५ टक्के आरक्षण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिष्यवृत्ती, क्रीडा साहित्य खरेदीसाठी निधी व भरपुर अशी मदत शासनाकडून मिळत असेही सांगीतले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा, जिल्हा क्रीडा परिषद तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध एकविध संघटना यांचे संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये मैदानी, हॅण्डबॉल, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बॉक्सींग, कराटे, जिम्नॅस्टीक, व आर्चरी, इ. खेळांचे प्रशिक्षण शिबीर दि. २५ एप्रिल २०२३ पासुन, सकाळी ६.०० ते ८:३० व सायंकाळी ५ ते ७:३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे सुरु आहे. यामध्ये बुलढाणा शहरातील व आजुबाजुचे परिसरातील जवळ- जवळ १५० ते २०० खेळाडू सहभागी झाले असुन, प्रशिक्षणार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून नियमित मार्गदर्शन सुरु आहे. यामध्ये डॉ. आशीष खासबागे (दंतचिकीत्सक), डॉ. लता बाहेकर (मानसोपचार तज्ञ), डॉ. अश्विनी जाधव चिखलकर (आहार व मधुमेह तज्ञ), डॉ. एस. बी. पवार (खेळ दुखापत व प्रथमोपचार), डॉ. मधुकर देवकर ( आरोग्य व इतर समस्या ), श्री. गजानन घिरके (चालु घडामोडी व मेडीटीशन), श्रीमती जोशी (सामान्य ज्ञान), इत्यादी तज्ञ मार्गदर्शकांचे व इतर सर्व शिबीरात होत असलेल्या कार्यक्रमाची सुध्दा माहिती यावेळी दिली. प्रशिक्षणार्थी खेळाडूंना बुलढाणा जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने गजानन शिंदे अध्यक्ष व राजु पाटील उपाध्यक्ष यांचे द्वारा टीशर्टचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे पदाधिकारी निलेश गावंडे, रवि वडते, अभिजीत निंबाळकर, इ. उपस्थित होते. कार्यालयाचे वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी शिंदे व राजु पाटील यांनी क्रीडा विभागाच्या प्रशिक्षण शिबीराबाबत समाधान व्यक्त करुन अशाप्रकारचे शिबीर हे फार आवश्यक असल्याचे सांगीतले. सदर शिबीरात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना दररोज कार्यालयाचे वतीने सकस आहार (अल्पोपहार) वाटप करण्यात येते. या कार्यक्रमाचे संचालन मनोज श्रीवास व आभार अनिल इंगळे यांनी मानले. शिबीराचे यशस्वी आयोजनाकरीता विजय वानखेडे, सुनिल जोशी, जोशी, डॉ. प्रा. बाबाराव सांगळे, निलेश शिंदे, गजानन घिरके, शशीकांत पवार, हर्षल काळवाघे, दिपक जाधव, भुषण शिरसाठ, गणेश डोंगरदिवे, सुहास राऊत व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सदर शिबीराचा समारोप दि. ५ मे २०२३ रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे आमदार संजय गायकवाड, बुलढाणा विधानसभा मतदार संघ, बुलढाणा, रुपेश खंडारे तहसिलदार, बुलढाणा, चंद्रकांत बर्दे जिल्हाध्यक्ष, जिल्हा पत्रकार संघ, बुलढाणा व इतर मान्यवरांचे शुभहस्ते संपन्न होईल. याप्रसंगी खेळाडूंच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले. गेल्या १० दिवसात खेळाडूंनी आत्मसात केलेल्या कौशल्याचे प्रात्यक्षीक तसेच शिबीरात सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल असे गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, यांनी सांगितले.

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *