प्लास्टिकने लोणार सरोवर झाले प्रदूषित..

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा 🙁 खोज मास्टर ) अकील शाह

लोणार : उल्कापातामुळे निर्माण झालेल्या प्लास्टिकमुळे हा जगप्रसिद्ध लोणार सरोवराची प्रदूषणामुळे दुर्दशा झाली आहे. जागतिक वारसा धोक्यात आला आहे. पुणे आणि मुंबई येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनात या सरोवरात १६ प्रकारचे वेगवेगळे घातक प्लास्टिकचे कण आढळले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबईतील महाराष्ट्र कॉलेज यांनी संयुक्तरीत्या लोणार सरोवरातील प्रदूषणाचा अभ्यास केला.प्रा. सचिन गोसावी आणि प्रा. समाधान फुगे यांचा या संशोधनात सहभाग होता. एन्व्हायर्नमेंटल सायन्स ॲण्ड पोल्युशन रिसर्च या संशोधन पत्रिकेत हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. अत्यंत दुर्मिळ शेवाळ तसेच जिवाणूंचे या सरोवरात लाखो वर्षांपासून अस्तित्व आहे. मात्र, या परिसरात होणारा प्लास्टिकचा सरोवरासाठी घातक आणि प्लास्टिकच्या सुक्ष्मकणांमुळे सरोवराचे सौंदर्य, संरचना आणि तेथील पर्यटनही धोक्यात आल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. लोणार सरोवर परिसरातील सीता न्हानी म्हणून परिचित असलेल्या अतिरेकी वापर ठरत आहे. आहे. प्लास्टिक कुंडात स्नानासाठी कायम गर्दी असते. प्लास्टिकच्या कॅरिबॅग लोक परिसरात फेकून देतात. याच बॅग उडून सरोवरात जातात. त्यामुळे सरोवरातील अतिप्राचीन जीवसृष्टी आणि जैवरासायनिक प्रक्रियेला धोका निर्माण झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सरोवरात १६ प्रकारचे सुक्ष्म कण आढळून आल्याचे धक्कादायक संशोधन पुणे, मुंबईच्या संशोधकांनी केले आहे. प्लास्टिक बंदी व्हावी लोणार सरोवर परिसरात कठोर प्लास्टिक बंदीची आवश्यकता आहे. सरोवर बघण्यासाठी येणारे पर्यटक, या परिसरात असलेल्या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या यात्रेकरूंसाठी प्लास्टिक विरोधात अभियान राबविण्याची गरज आहे शासन आणि वन विभागाने मिळून या परिसरात प्लास्टिक बंदीचा निर्णय प्रभावीपणे राबवला पाहिजे, असे या शोधनिबंधात स्पष्ट म्हटले आहे.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *