दानशूर असावा तर गणेश दांदड़ें सारखा! दीड़ लाखाचा सौर उर्जा पॅनल जि.प. शाळेला दिला गीफ्ट ड़ोंगरगावची जि.प. शाळा झाली वीज बीलमुक्त!

Khozmaster
1 Min Read

महेंद्र हिवाळे

 

डोंगरगांव ता. चिखलीचे सुपुत्र तथा जय ऋषी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल चे संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या गणेशराव दांदडे यांनी

१मे रोजी कामगार दीन तसेच महारष्ट्र दिनाचे औचित्य साधून

शाळेची गरज ओळखून स्वतःहून शाळेसाठी . शाळेला दिला दिड लाख रुपये किमतीचा सोलर पॅनल संच भेट

 

गणेशराव दांदाडे यांच्या सहकार्यातून बुलढाणा जिल्हा मधील पहिली शाळा ही सौर ऊर्जा तसेच मीटर मुक्त व बील मुक्त शाळा झाली आहे

श्री. गणेश गुलाबराव दांदडे यांनी जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा डोंगरगांव पं.स. चिखलीला २ केव्हीचा सोलर संपूर्ण संच २४ वर्षाचे वारंटीसह भेट दिला. त्यामुळे शाळा मीटरमुक्त व बीलमुक्त झाली.

त्यानिमित्त शाल, श्रीफळ देऊन मु.अ. श्री सुरडकर सर यांनी

‘गणेशराव दांदडे यांचे स्वागत केले. गणेशराव दांदाडे यांच्या वडिलांचे स्वागत जाधव सर यांनी केले. प्रमुख उपस्थिती मध्ये गावचे सरपंच श्री डिगांबर दांदडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा-सौ. अनिता ज्ञानेश्वर दांदडे तसेच सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

कार्यक्रमाचे संचलन – श्री. शेख चाँद सर यांनी केले. आभार प्रदर्शन – श्री. गजानन आहेर सर यांनी केले.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *