बोरगांव वसू येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ….

Khozmaster
3 Min Read

चिखली l महेंद्र हिवाळे 

संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विश्र्वशांती बुद्धविहार जेतवन बोरगांव वसू येथे उत्साहात साजरी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्रिसरण पंचशील ग्रहण करून पूजन करण्यात आले. ‘बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संगम शरणं गच्छामी’ या पंचशिलाने परिसरात मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर खीर दान करण्यात आली.

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे.हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

बुद्ध पौर्णिमेला सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्‍त झाले. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रुपाने साजरी होते. भगवान बुद्धांनी जगाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्यांनी लोकांच्या दु:खांची कारणं सांगून त्या दु:खांचं निवारण देखील सांगितलं. बिहारच्या बोधगयामध्ये बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच कुशीनगरमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. बुद्ध पौर्णिमा जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे राजवैभव सोडून जगातील दुःख नाईशे करण्यासाठी तथागतांनी ज्ञानचा मार्ग अवलंबला होता. वैशाख बुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ शोधण्यास बुद्ध यशस्वी झाले. दुःखाचे मूळ कारण शोधणाऱ्या ताथागतचा जन्म दिवस हा जगात बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

यावेळी विश्वशांती बुद्धविहार जेतवन व्यवस्थापन समितीचे, पदधिकारी अध्यक्ष,किशोर इंगळे,उपाध्यक्ष सत्यवान काकडे,सचिव श्रीकिसन इंगळे, कार्यध्यक्ष गजानन गवई, सदस्य,प्रकाश इंगळे,सुरेश मोरे,मनोहर घेवंदे,कौतिकराव इंगळे,राम इंगळे, मालताबाई इंगळे,रेखा काकडे, संगीता साळवे, सरपंच अनिता माने, उपसरपंच,कमलाकर रुद्राक्ष सदस्य, हरसिंग छर्रे,छाया इंगळे,उमा इंगळे,विमलबाई गवई, नंदा इंगळे, साहेबराव इंगळे,आत्माराम भंडारे,सिद्धार्थ इंगळे,समाधान इंगळे,सचिन इंगळे मयूर मोरे, अनिल इंगळे,पंजाबराव इंगळे, भगवान इंगळे, हिम्मतराव वाकोडे,तेजराव इंगळे,भगवान काकडे, यांच्या सह इतर बौद्ध उपासक, उपसिका व गावातील अनेक मंडळी उपस्थित होती…

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *