चिखली महेंद्र हिवाळे
पाडळी शिंदे सह परिसराला अनियमित वीज पुरवठा डोखेदुखी बनला त्यास फोन परमिट सुद्दा साथ देत असतांना केव्हाही वीज पुरवठा भ्रमणध्वनी वरून बंद करून घेण्यात येत असुन गावागावात नसलेले एबी स्विच गावागावात असणे आवश्यक असतांना कनिष्ठ अभियंता यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही येथे ३३के व्ही सब स्टेशन असून येथून डिग्रस फिटर द्वारे गावठाण ला वीज पुरवठा करण्यात येतो त्यात पाडळी शिंदे,सावखेड नागरे,सुरा, नागणगाव,सरंबा, धोत्रा नंदई,मंडपगाव नवीन गावठाण, आदींना वीज पुरवठा होतो परंतु गेल्या चार दिवसांपासून रात्रीचा वीज पुरवठा खंडित व अनियमित यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नियोजन शून्य कारभारामुळे नाहकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यास सर्वस्वी कनिष्ठ अभियंता यांचा नसलेला वचक व बिघाड काढण्याचा दिलेल्या सूचनांचे जनमित्र यांच्या कडून पालन न करणे हे परिसरातील जनजीवन प्रभावित करीत असून रात्र रात्र वीज पुरवठा खंडित व डीम फुल राहत असून २८एप्रिल ते १मे या चार दिवसात परिसरातील वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले असून झालेला बिघाड दुरुस्ती कडे दुर्लक्ष व वेळकाढू पणा सर्वसृत परिसराने अनुभवला असून पावसाळा सुरू होण्या पूर्वी जर हे हाल होत असतील तर पावसाळ्यात वीज पुरवठा साठी जनजीवन प्रभावित होऊन उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही व वीज पुरवठा दुरुस्ती करण्याचे नसलेले नियोजन व जनमित्र यांच्यावर कनिष्ठ अभियंता यांचा नसलेला वचक दिलेल्या सूचना एका कानाने एकूण दुसऱ्या कानाने सोडून देने व जनजीवन विस्कळीत करणे तसेच ३०एप्रिल व १मे रोजी रात्री तर कुठल्याच प्रकारचे पावसाचे प्रमाण नसतांना तीस तारखेला संपूर्ण फिटरच अंधारात चाचपडत राहिले तर १मे ला एक तार फुल तर दोन डीम असा वीज पुरवठा २मे पर्यंत होता परिसरातील ग्रामस्थ यांनी कार्यालयाच्या भ्रमणध्वनी वर व कनिष्ठ अभियंता यांच्या सुद्दा भ्रमणध्वनी वर होत असलेल्या वीज पुरवठा बाबत माहिती दिली परंतु अगोदर वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचेच सूतोवाच करण्यात येऊन वेळ काढू पणा करण्यात येत होता त्यावर खुलासा करण्यासाठी ठीक ठिकाणी असलेल्या गावातील व्यक्तीना कॉल च्या माध्यमातून जोडून वीज पुरवठा कसा आहे हे विचारण्यात येऊन डीम फुल वर शिक्कामोर्तब झाले त्यानंतर कनिष्ठ अभियंता योगेश वीर यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत चालू करण्याच्या सूचना दिल्या परंतु रात्रभर वीज पुरवठा सुरळीत चालू करण्यात आला नव्हता जनमित्र यांनी केवळ हो म्हणून वेळकाढू धोरण अवलंबून नेहमी प्रमाणे वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे पाठ फिरवली होती हे वास्तव समोर आले एवढे मात्र खरे!.
कार्यकारी अभियंता जायभाये यांनीच उपचार करण्याची गरज निर्माण झाली असून रात्री उशिरा ठेकेदार यांच्यावर मेहेरबान होऊन पुन्हा यावे लागणार नाही म्हणून जळलेले रोहित्र बसविण्यात येते तेवढीच कार्यतत्परता बीघाड साठी घेण्यात येत नाही व कनिष्ठ अभियंता यांच्यावर उपकार्यकारी अभियंता यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने व देऊळगाव मही सब स्टेशन च्या वीज पुरवठा बाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्दा या अगोदर रब्बी हंगामात उपकार्यकारी अभियंता यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर ही त्यांनी याकडे दुर्लक्षच केले म्हटल्यास वावगे ठरू नये व आता शेवटची आस म्हणून कार्यकारी अभियंता जायभाये यांनीच उपचार करणे आवश्यक आहे.
Users Today : 17