शेगांवः अखिल भारतीय बेलदार समाज संघटनेचे वतीने आयोजित बेलदार समाज सामुहिक विवाह सोहळा बाळकृष्ण भगेवार यंाच्या अध्यक्षतेखाली दि.४ मे रोजी कृष्णाजी मळा,शेगांव येथे संपन्न झाला. यावेळी खा.प्रतापराव जाधव, आ. डॉ.संजय कुटे, डॉ.स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आर्थिक दुर्बल घटकातील गरजु, गरीब, उपवरवधुंच्या विवाह खर्चामध्ये बचत व्हावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा यासाठी सदर सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यामध्ये १२ जोडप्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी खा. प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते समाजातील उपक्रमशिल शेतकरी बाळासाहेब रामचवरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजबांधवापैकी प्रामुख्याने पुरुषोत्तम बिलेवार, सुरज भगेवार, अशोक मांजरे, मुंकद आडेवार, जानकीराम पांडे, जगदेव पांडे, सुरेश घटे, पी.आर.सुलताने, श्रीराम भोंगरे, गजानन मांजरे, नामदेव बिलेवार, केशव बिलेवार, ईश्वर पांडे, ह.भ.प.मुंडे महाराज, पत्रकार पि.टी.पांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती लाभली.
कार्यकमाची सुरवात ललीता मेंहगे व त्यांच्या समुहाने स्वागतगिताने केली. बेलदार महिला आघाडीच्या सौ.माधुरी बगे,सौ. वनमाला चौके, सौ. लक्ष्मी सैरिशे,सोनाली भगेवार, छाया तलवारे आदींनी पाहुण्याचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश जांभुळकर, सचिन मेहंगे, वैभव बिलेवार, आदित्य बिलेवार, योगेश पाखरे, नंदलाल बिलेवार, राजेश पाखरे, भावलाल इंदोरे, महादेव पाखरे, महादेव मेहंगे, इंद्रजीत बिलेवार, आदिंनी विशेष श्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुरज भगेवार तर आभारप्रदर्शन गजानन तलवारे यांनी केले.
Users Today : 17