प्रति चिखली:—बुलडाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांवर काही ना काही येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा कंपनीचे अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही त्यात शेतकऱ्यांवर 12 महिने आसमानी संकट चालूच आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये पीक काढल्याशिवाय शेतकरी कोणतेच कर्ज देऊ शकत नाही अशा परिस्थितीत आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने त्वरित नुकसान भरपाई सरसकट देण्यात यावी शेतकऱ्यांवर जे बँकेचे कर्ज आहेत ते राज्य सरकारने माफ करावे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्वरित शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी दिला निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा महासचिव सलीमभाई, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर सदस्य दीपक तायडे, राहुल साळवे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 17