चिखली: 06 मे 2023
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्हयातील 10 पैकी 7 बाजार समित्यांवर मतदारांनी टाकलेल्या विष्वासातुन महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. या निवडणुकी दरम्यान राज्यातील सत्तेत असणा-या विरोधकांनी वापरलेली सर्व शस्त्रे बाद करीत सत्तेत नसतांनाही चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधीक मताधिक्याने दिलेला विजय ऐतिहासीक आहे. या विजयाच्या षिल्पकारांचे आभार मानण्याबरोबरच बाजार समितीच्या निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीला राज्यात बळ दिले, तर दुसरीकडे विरोधातील भाजपा व षिंदे गटाचा सुपडा साफ केला हा महाविकास आघाडीवर मतदारांनी दर्षवीलेला विष्वास व महाविकास आघाडीतील एक जुटीचा परिणाम आहे. यातुन सत्ताधा-यांनी सुडबुध्दीचे राजकारण न करता सुसस्कृतपणा जोपासावा असा मौलीक सल्ला बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचीत संचालकांच्या वतीने जाहीर आभार मेळाव्या प्रसंगी चिखली येथे दिला.
अत्यंत चुरषीच्या तितक्याच थरारकपणे पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडी बळीराजा पॅनलचे 11 उमेदवारांची उमेदवारी विरोधकांनी केलेल्या कारवाईतुन रद्द ठरली असतांना बळीराजा पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी एकतर्फी कौल देत 17 जागी प्रचंड मतांनी विजयी केले. ऐतीहासीक विजयाचे षिल्पकार असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, अडते, व्यापारी तसेच ज्यांनी या निवडणुकीत जिवाचे रान केले अषा सर्व घटकांचे आभार मानण्याकरीता आभार मेळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविकास आघाडीतील घटक असलेल्या प्रमुख नेत्या माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, षिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, शेतकरी नेते एकनाथराव थुट्टे, आदी प्रमुख मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, या निवडणुकीत विरोधकांनी विविध आमिषे देत पैसाचा पाउस पाडला. तरी मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीषी भक्कपणे बळ उभे करून भाजपा व षिंदे गटाचा सुपडासाफ केला. माइया राजकीय वाटचालीत मी अनेक निवडणुका लढलो, जिंकलो, मात्र बाजार समितीच्या ऐतिहासीक विजयाने मला बळकटी दिली. निवडणुकी दरम्यान विरोधकांनी केलेल्या दबावतंत्राला न जुमानता मतदारांनी एकजुट व एक दिलाने भक्कपणे महाविकास आघाडीला बळ दिले. जिल्हयातील बाजार समितीत्यांपैकी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधीक मताधिक्याने मतदारांनी ऐतिहासीक विजय मिळवुन दिला. हे केवळ एकजुटीमुळेच शक्य झाले असुन आम्ही सुडबुध्दीचे राजकारण करण्यापैक्षा थेट मतदारांषी संपर्क साधला. त्यामुळेच हे यष प्राप्त झाले असल्याचे सांगुन विराधकांनी दुस-याची रेष पुसण्यापैक्षा स्वतःची रेष मोठी करावी, येत्या काळात शेतकरी हित जोपासुन बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी वचनबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी संचालकांच्या वतीने केले.
याप्रसंगी षिवसेना संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले, या निवडणुकीत दबावतंत्राचा वापर करणा-या सत्ताधा-यां बरोबरच गद्यारी करणा-यांना मतदारांनी धडा षिकविला आहे. विरोधकांनी वाटप केेलेले पॉकीट, साडया, अधिकारी वर्गाचा वापर, सारेकाही फोल ठरले. राज्यातील घडत असलेल्या घटनांच्या तिरस्कारातुन त्रस्त झालेल्या मतदारांनी केलेल्या एकतर्फी मतदानातुन बळीराजाच्या 17 विमानांनी भरारी घेतल्याचे व येत्या काळात बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष दयावे लागणार असल्याचे सांगितलेे. तर यावेळी माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर म्हणाल्या की, राज्यासह जिल्हयात व चिखलीतही मतदारांनी महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलला भरघोष मतांनी विजयी केले. येत्या काळात शेतकरी हित जोपसण्याबरोबरच समितीचे उत्पन्न वाढविणे तसेच मतदारांनी टाकलेल्या विष्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, शेतकरी नेते एकनाथराव थुट्टे यांची समयोचित भाषने झाली तर बाजार समितीचे माजी सभापती विष्णु पाटील कुळसुंदर यांनी आपले मनोगत व्यकत केले. नवनिर्वाचीत संचालकांच्या वतीने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे विषालकाय हार देवुन स्वागत करण्यात आले तर नवनिर्वाचीत संचालक पांडुरंग पाटील भुतेकर, समाधान सुपेकर, श्रीकिसन धोंडगे, डॉ. संतोष वानखेडे, रामभाउ जाधव, समाधान परीहार, रामेष्वर खेडेकर, संतोष वाकडे, गणेष थुट्टे, सौ. कमलताई कुळसुंदर पाटील, श्रीमती मंदाबाई भुतेकर, मनोज लाहुडकर, परमेष्वर पवार, श्रीकृष्ण मिसाळ, संजय गवई, जय बोंद्रे, निरज चौधरी यांनी सभा ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या मतदार बंधु भगिनींवर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक विष्णु पाटील कुळसुंदर यांनी, संचलन डॉ. संतोष वानखेडे तर आभार प्रदर्षन डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले.
ज्योतीताई खेडेकर, दिपक देषमाने, नंदु क-हाडे, डॉ.इसरार, विष्वासराव खंडागळे, अतहरोद्यीन काझी, संजय गाडेकर, कुणाल बोंद्रे, नंदुभाउ षिंदे, संचिन बोंद्रे, दिपक म्हस्के, सुनिल तायडे, गजानन लांडे पाटील, अषोकराव पडघान, ज्ञानेष्वर सुरूषे, सुभाष देव्हडे, बिदुसिंग इंगळे, जगन्नाथ पाटील, रवि तोडकर, भगवानराव काळे, दत्ता सुसर, प्रमोद पाटील, दिलीप वानखेडे, विनायक सरनाईक, डॉ. भगवान उबंरकर, मनोज खेडेकर, लखन गाडेकर, शेषराव कानडजे, विष्णु मुरकुटे, अरून खडके, माणिकराव खांडवे, यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
Users Today : 17