सोयगाव : सोयगाव तालुक्यातील गावा-गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी ; महाराष्ट्र नवनिर्मान सेना

Khozmaster
2 Min Read

सोयगाव तालुक्यातील तालुक्यात गावोगावी खुलेआम भर वस्तीत सुरू असलेले कल्याण – मुबई वरळी मटका बेटिंग, झण्णा मन्ना पत्ताचे तिररट खेळ,अवैध देशी-विदेशी व हातभट्टीच्या दारूच्या अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे.हे अवैद्य धंदे पोलीस।प्रशासनाने तात्काळ बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभाग, तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील सोयगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सोयगाव बिटमधील सोयगाव ,आमखेडा, जरंडी, निंबायती, बहुलखेडा, माळेगाव, घोसला, बनोटी बिटमधील तिडका, वरठाण,बनोटी, गोंदेगाव, किंन्ही, उप्पलखेडा, हनुमंताखेडा, वडगाव,मोहलाई तसेच वरखेडी आदी गावागावात खुलेआम भर वस्तीत सुरू असलेले कल्याण – मुबई वरळी मटका बेटिंग, झण्णा मन्ना पत्ताचे तिररट खेळ,अवैध देशी-विदेशी व हातभट्टीच्या दारूच्या अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे.

तालुक्यातील गावागावात बेरोजगार तरुण व्यसनाधीन झाले असून अनेकांची घरे उद्धवस्त होत आहे. विशेषतः महिलांचे संसार उघडे पडले आहे. हे अवैद्य धंदे पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर विभाग, तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष रामा एलिस, तालुका सचिव निखिल शिंदे, महिला तालुका अध्यक्ष लिलाबाई पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

“”बनोटी येथील ग्राम पंचायतीचा ठराव देऊन अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी केली असतांना बनोटी पोलीस कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांत तीव्र रोष निर्माण झाला आहे. बनोटी गावात भर वस्तीत जिल्हा परिषद शाळा, वाडी- पळाशी रस्ता, टेकडी,बनोटी चौफुली, इंदिरानगर परिसरात अवैध देशी दारू व हातभट्टीच्या गावरान दारूची दिवसा ढवळ्या सर्रास खुले आम विक्री होत आहे.

नागरिकांकडून या अवैध दारू व गावरान दारू विक्रेत्यांना समजावण्यासाठी गेले असता,अवैध दारू विक्रेते दादागिरीची भाषा वापरून दमदाटी करतात.

 

“”पोलिसांना अवैध धंद्यावर छापे मारण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे बनोटी परिसरात अवैध दारू विक्रीसह अवैद्य धंद्याच्या बाबतीत वॉश आउट मोहीम हाती घेण्यात आली आहे यासाठी स्वतंत्र पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे.या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल

सपोनि अनमोल केदार

  पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सोयगाव

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *