चिखली जि बुलडाणा येथे कृ ऊ बा समितीत महाविकास आघाडीच्या बळीराजा पँनलला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत आभार मेळावा संपन्न.

Khozmaster
1 Min Read

चिखली जि बुलडाणा येथे कृ ऊ बा समितीत महाविकास आघाडीच्या बळीराजा पँनलला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत आभार मेळावा संपन्न.*

मौनीबाबा संस्थान, चिखली जि. बुलडाणा येथे आज दि. ०६/०५/२०२३ रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलला प्रचंड मतांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अडते व व्यापारी आदी मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळावा माजी मंत्री मा आ डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच #शिवसेना_संपर्कप्रमुख_प्रा_श्री_नरेंद्र_खेडेकर,माजी आ तथा काँग्रेस कमिटिचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल बोंद्रे, माजी आ श्री हर्षवर्धन सपकाळ, अमरावती पदवीधर मतदार संघाचे मा आ श्री धीरज लिंगाडे, मा आ सौ रेखाताई खेडेकर, शिवसेना (उ बा ठा ) जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अड. नाझेर काझी, शेतकरी नेते श्री एकनाथ थुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी मान्यवरांनी निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांचा सत्कार केला तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अडते व व्यापारी यांच्यासह महा विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *