मोताळा शहरामध्ये साकार होणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य-दिव्य स्मारक बांधकाम तसेच सौंदर्यीकरणासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याकडून १ कोटी रुपयाच्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र स्मारक समितीकडे सुपूर्द*
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून संपूर्ण बुलढाणा शहराचा तसेच मतदारसंघाचा कायापालट होत आहे…!
दिनांक – १७ मार्च २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व लेवापाटीदार समाजातर्फे बुलढाणा येथे झालेल्या स्मारक बैठकीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांची सर्व समाज बांधवांच्या वतीने एकमताने स्मारक समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, त्यानंतर *आज दिनांक ६ मे २०२३ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालय मध्ये उपस्थित सर्व लेवा पाटीदार समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये एक कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी त्यांना सुपूर्द केले…!*
बुलढाणा शहरामध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून सर्व समाजाच्या महापुरुषांची स्मारक भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आकारास येत आहे,अशाच सर्व स्मारकाप्रमाणे ३ वर्षापासून धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या डोक्यामध्ये जी संकल्पना होती, की देशाचे माजी गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल असे लोहपुरुष या जगामध्ये तसेच भारतामध्ये पुन्हा कोणी झालं नाही, अशा या लोहपुरुषाचा पूर्णाकृती पुतळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही एका गावामध्ये असावा,अशी इच्छा होती…!
त्यानुसार धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या विकसनशील प्रयत्नातुन मोताळा शहरांमधील पंचायत समितीतील ५००० स्क्वेअर फुट जागा ही लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी मिळवून दिली त्यानंतर लगेच एक कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेची पत्र देखील महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून मिळून दिले, अशाप्रकारे दोन्ही शब्द बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पाळून पुन्हा एकदा बोले तैसा चाले या शब्दाची प्रचिती करून दिली….!
यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील सर्व लेवापाटीदार समाज बांधव तसेच समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते….!
Users Today : 17