सिनेमागृह मिळत नसल्याची ओरड करण्यापेक्षा दर्जेदार सिनेमाची निर्मिती करा…. बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Khozmaster
5 Min Read

मुंबई -(संजय धाडवे) अलीकडेच एका निर्मात्याने इमोशनल होऊन,”मराठी सिनेमा संपवला जातोय”

अश्रू अनावर होऊन; हात जोडत भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे

सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झालेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक यांनी व्यक्त केली आहे. *ज्या ठिकाणी या सिनेमाचा शो लागल्यानंतर आम्ही काही थेटर मालकांकडे चौकशी केल्यानंतर या सिनेमाला गेली चार दिवसात कुठेही बुकिंग व्यवस्थित नसल्याचे दिसून आले* त्या *ठिकाणी आम्ही डिस्ट्रीब्यूटर चे रिपोर्ट देखील चेक केले दिवसाला एक शो ला दहा, पंधरा, वीस अशी तिकीट विक्री झाल्याचे आमचे निदर्शनास आले*, *एवढ्या तिकिटांमध्ये त्या थेटर मालकांचे एसीचे किंवा तिथे काम करणाऱ्या पाच-दहा मुलांचे दिवसाचा पगार देखिल निघू शकत नाही*. *अशा परिस्थितीमध्ये थेटर मालकाच्या बाजूने देखील विचार केला पाहिजे*, त्याचबरोबर सिने निर्माते दर शुक्रवारी कमीत कमी पाच ते दहा सिनेमे हे रिलीज करत असतात त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर निर्मात्यांना आणि थेटर मालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, कुठला सिनेमा घ्यायचा त्या सिनेमाला किती शो द्यायचे, यामध्ये थेटर मालकांची मोठी कसरत होत असते. हा देखील विचार आपण केला पाहिजे, दरम्यान मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर सिनेमे प्रसिद्धीतच मार खातात त्याचे अनेक उदाहरणे आहेत. सिनेमाची निर्मिती करताना उत्कृष्ट कथा/ गीत ,उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट मांडणी चित्रपटाची असेल तर सिनेमे थेटर मालक सुद्धा सिनेमे घेताना रांगेत उभे असतात. याची अनेक उदाहरणे मराठी सिनेमा बाबतीत आपण अनेकदा बघितली आहेत. त्या तुलनेत हिंदी चित्रपट किंवा साउथच्या सिनेमांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी असल्याची ओरड सातत्याने होते. मात्र आपण कधी हा विचार केला आहे का? की साउथ चे सिनेमे हिंदी सिनेमेची लाखोचे बजेट असतात सोबत ते प्रसिद्धी मोठ्या प्रमाणत करतात.

*तसेच सिनेमा दर्जेदार असेल तर त्याला प्रेक्षक आवर्जून उपस्थित राहतात यात तीळ मात्र ही शंका नाही. त्यामुळे ओरड करण्यापेक्षा जर हिंदी सिनेमातून काही शिकता आल तरच खऱ्या अर्थाने थेटर मालक सुद्धा आपल्या सिनेमांना न्याय देतील ही अपेक्षा व्यक्त करण्यास संयुक्तिक ठरेल*. उदाहरण झालं तर प्रसिद्धीचा भाडीमार केलेल्याच सैराट सिनेमा तुफान गर्दीत चालला जेव्हा की चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकार सुद्धा नवीन होते तरीसुद्धा मराठी सिनेमासाठी तासंताच रांगा लागून होत्या हेही आपण अनुभव आहे. जर सिनेमाची निर्मिती करतानाच मार्केटिंगचा विचार जर केला तर सिनेमा थेटरला चालताना कुठल्याही अडचणींना समोर जाण्याची गरज पडत नाही, मात्र मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेकदा चित्रपट निर्मितीनंतर वितरणाचा आणि मार्केटिंगच्या अतिशय महत्त्वाच्या समस्येला समोर जावे लागते. कारण वितरण आणि मार्केटिंग साठी मराठी चित्रपट निर्मात्याकडे बजेटच नसल्यामुळे नाईलाजास्तव सिनेमे चांगले असताना सुद्धा ते खऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे प्रेक्षक त्या सिनेमापर्यंत येत नाहीत ही बाब पण आपण सर्वांनी मान्य केली पाहिजे.असे मत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे. चित्रपट निर्मिती करत असताना प्रेक्षकांच्या चॉईस प्रमाणेच चित्रपटाची निर्मिती झाली तर चोखंदळ असलेला प्रेक्षक हा सातत्याने आपल्या सिनेमाकडे प्रामुख्याने हजर राहील.आणि *जर सिनेमा चांगला नसेल तर निश्चितच त्या सिनेमाला प्रेक्षक येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकावर आपल्या निष्करित्याचं खापर फोडणे हे कितपत योग्य आहे*. *मराठी हिंदी किंवा कुठलेही भाषेतील चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनोरंजनचे साधन तर आहेच सोबत प्रचाराचे उत्कृष्ट माध्यम आहे. त्यामुळे मराठी सिनेमा संपवला जात आहे. असं म्हणणं मुळात चुकीचा आहे. निर्मात्याने जितकी थेटर आपल्याला मिळाली आहेत. ती थेटर खऱ्या अर्थाने भरली आहेत का याचे सुद्धा संशोधन करणे गरजेचे आहे*. *आपल्या निष्क्रियतेचा मराठी प्रेक्षकांवरती खापर फोडण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपल्या सिनेमात ती ताकद असली पाहिजे. की ज्याच्यासाठी मराठी प्रेक्षक हा घरातून सिनेमा बघण्यासाठी निघालाच पाहिजे*. याच महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दादा कोंडके अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे या फळीतील लोकांच्या सिनेमांच्या गोल्डन, व सिल्व्हर जुबली साजरा केली आहे.

उगाच प्रत्येक वेळी मराठी निर्माते व दिग्दर्शक उठतात आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नाव ठेवतात हे खरंतर खूप मोठ्या प्रमाणावर चुकीच आहे महाराष्ट्रातील आपला मराठी प्रेक्षक हा खूप सुज्ञान आणि हुशार आहे त्यांना कुठल्याही, प्रकारे सांगायची गरज पडत नाही* हाच तो प्रेक्षक राजा आहे त्यांनी जर ठरवलं तर एका दिवसात स्टार करते आणि एका दिवसात जमिनीवर सुद्धा आणते याची माहती ज्यांना समजले तोच या क्षेत्रात टिकते.

बाबासाहेब पाटील: प्रदेशाध्यक्ष-

 राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *