देऊळगाव साकरशा हादरले, वाहनांच्या अपघाताने तीन जीवलग मित्र ठार !

Khozmaster
2 Min Read

शिवानंद पवार देऊळगाव साकरशा प्रतिनीधी

देऊळगाव साकरशा हादरले, वाहनांच्या अपघाताने तीन जीवलग मित्र ठार !

– मेहकर-खामगाव रोडवरील देऊळगाव साकरशा येथील भीषण दुर्घटना

– देऊळगाव साकरशा येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये भरधाव इर्टिगाने दुचाकीला उडविले, दरम्यान समोरून येणार्‍या पीकअपखालीही चेंदल्याने दुचाकीस्वार तिघे मित्र जागीच ठार झाले , बाकी गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहे . ही घटना मेहकर ते खामगाव रोड़वरील देऊळगाव साकरशा गावाजवळ ६ एप्रिलच्या रात्री आठ वाजेदरम्यान घड़ली. मृत झालेले तीनही युवक हे जीवलग मित्र होते, त्यांच्या अपघाती मृत्युमुळे देऊळगाव साकरशा गावावर शोककळा पसरली असून, नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच हंबरड़ा फोड़ला होता. दरम्यान, मृतकांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील शिवसेना (शिंदे गट) युवा सेना शहरप्रमुख शेख इरफान हुसेन वय ३७, सचिन उर्फ गोलू सुभाष नहार वय ३३ व लक्ष्मण सीताराम गवळी वय २८ हे तिघेजण दुचाकीने मेहकरकड़ून देउळगाव साकरशा गावाकड़े येत असताना, मागून भरधाव येणार्‍या इर्टिगाने त्यांच्या दुचाकीला जबर धड़क दिली, तर त्याचदरम्यान समोरून येणार्‍या पीकअपखालीही ते चिरडले गेले. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण जागीच ठार झाले . तसेच कारमधील गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या तीनही युवकांना धावाधाव करत खामगाव येथे दवाखान्यात नेले असता, ड़ॉक्टरांनी सदर तिघांना मृत घोषित केले. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच हंबरड़ा फोड़ला होता. या घटनेमुळे देऊळगाव साकरशा गावावर शोककळा पसरली आहे. जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कार्यवाही सुरू होती. मृतकांच्या शवपरीक्षणानंतर त्यांच्या पार्थिवावर आज देऊळगाव साकरशा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृतक तिघेही घनिष्ठ मित्र होते. तिघेही मनमिळाऊ व सुखदुःखात धावून जाणारे असल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

 

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *