प्रति चिखली:— प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा 90 हजार रुपयाचा चेक घरकुल लाभार्थ्यांना त्वरित वाटप करण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि.8 मे.रोजी चिखली नगरपालिका मुख्यअधिकारी यांना देण्यात आले. चिखली शहरामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना ही कित्येक वर्षापासून सुरू झाली असून घरकुल योजनेच्या नावाखाली नगरपालिकेने घरकुल योजना देण्यासाठी नागरिकांकडून विविध प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन नळपट्टी, घरपट्टी सारखे कर नगरपालिकेने घरकुल नागरिकांकडून वसूल केले प्रधानमंत्री योजना घरकुल चे दोन हप्ते देण्यात आले पण केंद्र सरकारकडून कित्येक वर्षापासून सुरू असलेले घरकुलचे हप्ते आतापर्यंत मिळालेच नाही केंद्र सरकार गोरगरीब जनतेचे दिशाभूल करत आहे केंद्र सरकार हे नागरिकांना अच्छे दिन हे नागरिकांना नगरपालिकेचे चक्रा मारू मारू दिसत आहे गोरगरिबांना घर नाही पण चिखली शहरांमध्ये रस्ते,नाली बनत आहे गोरगरिबांच्या घरात अवकाळी पाऊस घुसत आहे नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी बँक, उसने पैसे व्याजाने घेऊन घरकुल बांधले गोरगरिबांना व्याजाचे पैसे घेतले तेच लोकांना घरकाम मजुरी करून देणे चालू आहे घरकुल तर दूरच राहिले अच्छे दिवस केंद्र सरकार नागरिकांना दाखवत आहे नगरपालिकेने नागरिकांना ज्यांचे घर पुर्ण झाले अशा घरकुलवर घरक्रमांक टाकून नागरिकांची दिशाभूल करतांना दिसत आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा 90 हजार रुपयाचा हप्ता नागरिकांना त्वरित देण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आठ दिवसात चिखली नगरपालिका कार्यालयासमोर फाशी दो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनात दिला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर युवा उपाध्यक्ष अप्पू खान, शहर सदस्य दीपक तायडे, शाखा अध्यक्ष सौरभ बावस्कर, शेख दानिश कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 17