वयोवृद्ध आई व भावाच्या वैद्यकीय सेवेत त्यागला मुलीने स्वतःचा संसार

Khozmaster
1 Min Read

दिनांक 8 मे 23) शहरातील अग्रसेन चौकातील रहिवासी दिलीप ठाकूर हे गत चार वर्षापासून अर्धांग वायूच्या आजाराने त्रस्त आहेत तर त्यांची वयोवृद्ध आई कमलबाई सुद्धा विविध आजाराने पलंगवार खिळून होत्या, त्यांच्या कुटुंबात या दोघांच्या पश्चात दिलीपची लग्न झालेली बहीण लताबाई होत्या मात्र त्या सासरी राहायच्या भाऊ आणि आई यांची सेवा करण्यास घरी कोणीच नसल्याने लताबाईने देऊळगाव राजा येथे येण्याचा निर्णय घेतला व त्यांनी येथे येऊन आईची व भावाची वैद्यकीय सेवा सह घर संसार चालविण्यास सुरुवात केली घर ही भाड्याचे असल्याने व उत्पन्नाची साधने कोणतीच नाही बँकेत सुद्धा काही शिल्लक नाही अशातच शहरातील नामांकित देऊळगाव राजा क्रिकेट असोसिएशनचे (DCA)काही सदस्य पुढे आले त्यांनी सुरुवातीला दवाखान्याचा खर्च केला तर दानशूर म्हणून ओळखले जाणारे दीपक मल्लावत यांनी या कुटुंबाला भरीव मदत करीत गेल्या तीन वर्षापासून किराणा व अन्नधान्याचा पुरवठा केला सात मे रोजी कमलबाई रणजितसिंह ठाकूर यांचे सायंकाळी निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा सर्व खर्च सुद्धा मित्र मंडळींनी केला तर मुलगी लताबाई यांनी आईच्या पार्थिवास अग्नीडाग दिला व अंतिम कार्य पूर्ण केले लताबाईने स्वतःच्या संसाराचा त्याग करून आई व भावाच्या वैद्यकीय सेवेला वाहून घेतले आहे त्यांनी समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे,

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *