दबंग सुनील कडासने मातृतीर्थ जील्हाचे एस.पी.
_राजकीय वरदहस्तातून जिल्ह्यात बिहार राज….!_
बुलढाणा: (खोज मास्टर )अकीलशाह
_सुनील कडासने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना गोहत्या बंदीच्या कायदा आला. संवेदनशील मालेगाव मध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या विशेष कामगिरीमुळे राज्यपालांच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित झालेले सुनील कडासने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रूजू होनार आहेत.महाराष्ट्रातील नामवंत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असंख्य टोळ्यांचा बिमोड दबंग पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी केलेला आहे._
_आयपीएस अधिकारी महेश पाटील यांची ठाण्यात तर पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांची बुलढाणा येथे बदली झाल्याची माहिती राज्य गृह विभागाने सोमवारला अधिकृत रित्या जाहीर केली आहे. त्यांच्या बदलीबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. महेश पाटील पोलिस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथून ते अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर येथे बदली झाली आहे.सुनिल कडासने पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर येथून ते पोलिस अधीक्षक, बुलढाणा येथे बदली झाली आहे._
*नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना खूले आवाहन…*
_रोख सखे तो रोखलो…!_
_राजकीय वरद हस्तातून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील विस्कटलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे. महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवीने.महिलांच्या दागिन्यांची होणारी लूटमार थांबवीने, दैनंदिन वाढते अवैद्य धंदे बंद करने. , अनधिकृत कॅफे बंद करने, बनावट गुन्हयांची शूंखला थांबवणे, बनावट गुन्ह्यातून निर्दोष शेतकरी, नागरिकांची मुक्तता करणे.अस्सल गुन्हेगारांना जेरबंद करणे. महापुरुषांच्या मिरवणुकीत दहशत निर्माण करणाऱ्यांना जेरबंद करणे. गाव तेथे वरली अभियान थांबवणे. चोरी लुटमारी दरोडा दिवसाढवळ्या घडणाऱ्या घटनांना आळा घालने.
कृष्णप्रकाश पोलीस अधीक्षक असतांना मलकापूरचे एसडीपीओ म्हणून कार्यरत असलेले, बुलढाणा शहरात शिक्षण झालेले, सुनील कडासणे शेवटच्या दीड वर्षात बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.
हीच माफक अपेक्षा जिल्हा वासियांना आहे.
Users Today : 17