पाणी टंचाई निवारणार्थ सावरगाव माळ गावाला टँकर मंजुर

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा तालुक्यातील 1 गावाचा समावेश

 

बुलडाणा, दि‍.8 :- जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी (दरडोई दरदिवशी 20 लिटर्स) उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ या 1920 लोकसंख्या व 325 पशुधन असलेल्या गावासाठी 40 हजार 475 ली., टँकरव्दारे पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल),सिंदखेड राजा या कार्यालयाने कळविले आहे.

 

 

पाणी टंचाई निवारणार्थ मौजे पोखरी गावाला टँकर मंजुर

मोताळा तालुक्यातील 1 गावाचा समावेश

 

बुलडाणा, दि‍.8 :- जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी (दरडोई दरदिवशी 20 लिटर्स) उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील मौजे पोखरी या 650 लोकसंख्या व 200 पशुधन असलेल्या गावासाठी 15 हजार 250 ली., टँकरव्दारे पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *