सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार जेष्ठ मोहन जोशी ना प्रादान

Khozmaster
2 Min Read

मुबई (संजय धाडवे)मनोरंजन क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत ‘सांस्कृतिक कलादर्पण’ पुरस्कार नुकताच हा दैदिप्यमान सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपट, नाटक, मालिका, तंत्रज्ञ, पत्रकारिता, अशा विविध विभागातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्याला कलासृष्टीला अनेक तारेतारका, मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. चित्रपट विभागात ‘मदार’ चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी प्रसाद ओक ( धर्मवीर मु. पो. ठाणे) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी शिवाली परब ( प्रेम कथा धुमशान) आणि अमृता अग्रवाल (मदार ) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पिकासो, इंटरनॅशनल फालम फोक, वाळवी, ताठकणा, गावं आलं गोत्यात १५ लाख खात्यात, पांडू, बालभारती, टाइमपास ३, आता वेळ आली, शहीद भाई कोतवाल या चित्रपटांनीही विविध विभागात पुरस्कार प्राप्त केले आहेत. यावेळी नाट्य विभागात ‘सफरचंद’ या नाटकाने सर्वात जास्त पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशा विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. तर चर्चा तर होणारच, कुर्रे, पुनश्च हनिमून, वाकडी तिकडी, वुमन या नाटकांनाही विविध विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. तर टि. व्ही. मालिका विभाग संत गजानन शेगावीचे (सन मराठी टि. व्ही) मालिकेने ‘सर्वोत्कृष्ट मालिके’चा मान मिळवला असून लक्षवेधी मालिकेचा पुरस्कार ‘ठिपक्यांची रांगोळी’ (स्टार प्रवाह) ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शशांक केतकर (मुरंबा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ज्ञानदा रामतीर्थकर (ठिपक्यांची रांगोळी) यांना मिळाला आहे. तुमची मुलगी काय करते, बॉस माझी लाडाची यांनीही पुरस्कार पटकावले. तर पत्रकारिता विभागातही अनेकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *