प्रविण चव्हाण
नंदुरबार– : रब्बी हंगाम 2022-2023 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (मका व ज्वारी) खरेदी करीता NEML पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रकिया 4 ते 20 मे, 2023 पर्यंत राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. बी. सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नोंदणीसाठी ऑनलाईन पिकपेरा नमुद असलेला सातबारा उताऱ्यांची मुळप्रत, आधारकार्ड, बॅक खाते पासबुकाच्या प्रथम पानाची झेरॉक्स (जॉईंट खात्याचा वापर फक्त प्रथम खातेदार व्यक्तीनेच करावा. जॉईंट खात्यातील क्रमांक ०२ नंबर खातेदाराने नोंदणीकरीता खाते क्रमांक दिल्यास पीएफएमएस पोर्टलवरुन पेमेंट पडणार नाही याची शेतक-यांनी नोंद घ्यावी. मोबाईल नंबरची माहिती संबंधीत तालुक्याच्या सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या ठिकाणी नोंदणी करावी. रब्बी पीकांची भरडधान्य खरेदी 4 मे ते 30 जून 2023 पर्यंत असेल.
शेतक-यांना खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एस.एम.एस. द्वारे भरडधान्य घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. प्रत्येक शेतक-याकडून फक्त त्यांच्या कुटुंबातीलच (आई, वडील, मुलगा, पत्नी, पती) सातबारा उतारा ओळख पटविल्यानंतर स्वीकारण्यात येईल. तरी सर्व शेतकरी बांधवांनी भरडधान्याची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणी व खरेदी साठी आपआपल्या तालुक्यातील संबंधीत सहकारी खरेदी विक्री संस्थेशी संपर्क करावा. असेही सोनवणे यांनी कळविले आहे.
Users Today : 19