औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चिखली व मेहकर व्दारा छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबीर आयोजन

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि‍.9 :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,म.रा.मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली व शासकीय औद्योगिक प्रशक्षिण संस्था मेहकर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 मे 2023 रोजी श्री शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच 19 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता कृषी वैभव लॉन डोणगांव रोड मेहकर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिबीरामध्ये 10 वी 12 वी नंतर काय करावे, या भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास , बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नविन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांकडून करण्यात येणार आहे. रोजगार व स्वयंराजगारासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बुलडाणा जिल्हयातील सर्व विद्याथी्र व पालक यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखली व प्राचार्य एस.डी.गंगावणे तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकरचे प्रचार्य व्ही बी शिरसाट यांनी आवाहन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी चिखली व मेहकर येथे होणाऱ्या शिबीराचा लाभ घ्यावा.

0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *