बुलढाणा :
आगामी मान्सून काळात
संभाव्य आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘अॅक्शन मोड’ मध्ये आले असून, सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी शुक्रवारी दिले. मान्सूनपूर्व आपत्ती देत व्यवस्थापन आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये, असे बजावले.
दृकश्राव्य माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख सहभागी झाले होते.
बैठकीत १ जूनपासून सर्व नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
१ जूनपासून सर्व नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश
Users Today : 29