टिटवी, पळसखेडा येथे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिकाचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

शेतकऱ्यांनी उगम क्षमता चाचणी करून वापरावे;एस.जी.वाघ यांचे आवाहन

 

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील टिटवी व पळसखेडा दिनाक ८/५/२०२३ टिटवी येथे सोयगाव कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ यांनी सोयाबीन उगवणक्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी कृषी मंडळ अधिकारी आर जी गुंडिले, कृषी पर्यवेक्षक अतुल पाटील, कृषी सहाय्यक मानसिंग भोळे, कृषी सहाय्यक अर्जुन सुरडकर यांचेकडून शेतकऱ्याना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित पिक असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेऊन पेरणी

करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक शेतकऱ्यानी सोयाबीन बियाण्यांसाठी घरगुती बियाण्यांचे वापर करण्याचे आवाहन कृषी अधिकारी एस जी वाघ यांनी केले आहे.तसेच बियाण्यांचे वापर करण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगम क्षमता चाचणी करणे आवश्यक आहे.दरवषी फक्त ३३ टक्के बियाण्याची बदल करावे असे विद्यापिठाने शिफारस केलेली आहे.

६७ टक्के बियाणे पुढील हंगामाकरीता राखुन ठेवण्याकरीता शेतक-यांनी त्यांना लागणारे बियाण्यासाठी चांगल्या

जमीनीवर विशेष लक्ष देऊन दहा वर्षातील आतील जातीच्या वाणाची पेरणी करावी. या प्रक्षेत्रावरुन पुढील हंगामाकरीता

बियाणे म्हणुन वापरावयाचे असल्याने पिकाची योग्य काळजी घेऊन स्वतंत्र कापणी व मळणी करावी. उत्पादीत

बियाण्याचे योग्य प्रकारे प्रतवारी करुन सावली खाली ज्या ठीकाणी ओलाव्याचा संपर्क येणार नाही अशा ठीकाणी म्हणजे

लाकडी फळयावर एका पोत्यात जास्तीत जास्त ४० कीलो बियाणे असे एकुण ४ ते ५ थप्पीमध्ये साठवुन ठेऊन

पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासून पेरणी करणे अपेक्षीत आहे. परंतु शेतकरी धान्य म्हणुन साठवुन ठेवलेल्या सोयाबीनचा

वापर पेरणी करिता करत असल्याने उत्पादनात घट येते.

उगवण क्षमता चाचणीत 70 टक्के किवा त्यापेक्षा जास्त उगवण क्षमता आलेल्या सोयाबीनचाच बियाणे म्हणून वापर करावा. तसेच पेरणी पूर्वी बियाण्यास थायरम व रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी असे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या कडे राखून ठेवलेल्या घरच्या बियाण्यांचाच जास्तीत जास्त वापर करावा.अशे आवाहन कृषी अधिकारी एस जी वाघ सोयगाव यांनी केले आहे.याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,व्हा चेअरमन सांडू तडवी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *