बिडोओंचा तिढा काही मिटेना, विहिरीचे ग्रहण ग्रहण काही सुटेना

KHOZ MASTER
3 Min Read

हजारों कामे खोळंबली महिन्यांपासून मजुरांवर संकट;माजी सभापती धरमसिंग चव्हाण 

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव पंचायत समितीच्या बिडोओ संपामुळे: गत २९ दिवसांपासून राज्यातील बीडीओंनी संप पुकारला आहे. यामुळे सोयगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील गाव विकासाची कामे थांबली आहेत. ऐन उन्हाळ्यात बीडीओच्या संपामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामांना ब्रेक लागला आहे. यातून हजारोवर कामे प्रभावित झाले आहेत. बोगस मजुरांच्या प्रकरणात बीडीओंना जबाबदार धरण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसह ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेच्या कामांचे मस्टर काढण्यात यावे यासाठी राज्यात बीडीओनी आंदोलन सुरू केले आहे. ११ एप्रिलपासून राज्यात सुरू झालेल्या या आंदोलनाला सरकारने अजूनही कुठलेही उत्तर दिले नाही. यामुळे हे आंदोलन अजूनही कायम आहे. मात्र, या आंदोलनामुळे बीडीओंच्या अखत्यारीत येणारी कामे खोळंबली आहेत.घरकुलाच्या महत्त्वपूर्ण कामाला युद्ध पातळीवर करण्याचे आदेश आहेत. मात्र, सोयगाव पंचायत समितीच्या बीडीओच्या संपामुळे घरकुलाचे मस्टरच निघणे बंद झाले आहे. यातून मजुरांची मजुरी निघत नाही. परिणामी, उन्हाळ्यातील घरकुलाची कामे थांबली आहेत. यापूर्वी वाळू नसल्याने घरकुलाची कामे थांबली होती. आता बीडीओच्या संपामुळे कामे थांबले आहेत. पुढे पावसाळा असून, यात कामे कशी पूर्ण होणार, हा प्रश्न लाभार्थी यांना पडला आहे.

यासोबत रोहयोच्या माध्यमातून गोठ्यांच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, मजुरांच्या कामाचे मस्टरच निघाले नाही. यामुळे गोठ्यांची कामे थांबली आहेत. तर मंजूर झालेल्या सिंचन विहिरींची कामे थांबली आहेत. इतकेच नव्हे, तर पाणंद रस्त्यांवर असेलल्या मजुरांचे मस्टरही निघाले नाही. यातून पाणंद रस्त्यांच्या कामाला खीळ बसली आहे. वृक्ष लागवडीच्या कामात खड्डे तयार करणे आणि

नर्सरीमध्ये वृक्षाचे संगोपन करण्याचे काम रोजगार हमी योजनेतून केले जाते. या कामावरील मजुरांचे रजिस्टरच मिळाले नाही. यातून मजुरांची कामे थांबली आहेत.

ग्रामविकासाच्या योजना प्रभावित झाल्या आहेत. शासन स्तरावर अजूनही या संपाबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कामे थांबवावी लागतात की काय?

▪️ महिन्यांपासून सोयगावात मजुरांवर संकट

“”रोजगार हमी योजनेच्या कामांवर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला रोजगार नाही.यातून मजूर चांगलेच अडचणीत आले आहेत.अजूनही संप मिटला नाही.यामुळे मजूर चांगलेच वैतागले आहेत.या मजुरांवर उपासमार ओढावली आहे.

माजी सभापती धरमसिंग चव्हाण सोयगाव,नादांतांडा

▪️ सोयगाव पंचायत समितीचे कामे ठप्प

“”सोयगाव पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील कामे सुरू आहे.प्रत्येक छोटे मोठे असे हजारों कामे बीडीओच्या संपामुळे थांबली आहे.हा संप मिटण्याचे कुठलेही चिन्ह दिसून येत नाही.त्यातून विकासकामे प्रभावित झाली आहेत

सरपंच सौ रत्नाताई सुरेश चव्हाण घाणेगांव तांडा ता सोयगाव

 

0 9 7 2 6 6
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *