भाग -2
कार्यालय, प्रतिनिधी – मेहकर महसूल अंतर्गत पारित आदेशान्वये नगरपरिषद हद्द तथा हदीबाहेरील लेआउट प्रकरणांमध्ये विविध कोडे उलगडत आहेत. ग्राम खंडाळा परिसरात नव्याने अनेक लेआउट पडले आहेत. यामधील बहुतांश लेआउटमध्ये नियमाची पायमल्ली झाली, तरीसुद्धा प्लॉट विक्री जोमात सुरू झाली आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला.ज्यामध्ये “तो दलाल “प्लॉट ग्राहकांचे ईसार रक्कम घेऊन पसार झाल्याची चर्चा परिसरात पसरली आहे.
मेहकर परिसरात पसरलेल्या चर्चेनुसार प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे दलाल ग्राहकांना गंडवून लाखो ची मायापुंजी जमा करीत आहेत. शेत जमिनीची एन. ए. ऑर्डर प्रस्तावित असतानाच या लेआउट मधील प्लॉट विक्री करून ग्राहकांना फसवण्याचे काम सुरू आहे. नगरपरिषद हद्द तथा हद्दीबाहेरील बहुतांश लेआउट मध्ये नागरिकांना सोयी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अधिकाऱ्यांशी संगणमत करून अशा प्रकारची लेआउट विक्री सुरू आहे. ग्राम खंडाळा परिसरातील” त्या “लेआउटची विक्री करत असताना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पेशगी रक्कम घेण्यात आली . बराच काळ उलटूनही त्या ग्राहकांना त्यांच्या हक्काचे प्लॉट खरेदी करून न देता तो दलाल नभी गायब झाले असल्याची चर्चा सर्वत्र जोम धरत आहे. पै- पै जमा करून आपल्या स्वप्नाच हक्काचं घर व्हावं याकरिता सर्वसामान्यापासून, नोकरदार लोक शहराला लागून असलेल्या विविध लेआउट मध्ये सुलभ हप्त्यावर मिळत असलेल्या ह्या प्लॉटिंगला बळी पडतात. आपल्या आवडी- सवडीनुसार मिळत असलेल्या प्लॉटमुळे यामध्ये सखोल अभ्यास करण्याची मानसिकता ग्राहकांची नसते.याचाच फायदा घेत सक्रिय झालेले दलाल तथा लेआउटधारक मातीमोल भावात घेतलेल्या जमिनीचे प्लॉटिंग करून सोन्याचाच किमतीत या जमिनीची विक्री करतात.नियमाला बगल देऊन पळवाट काढलेल्या अशा अनेक लेआउट मुळे दलालाची मोठी चांदी झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी आपले अधिकार तथा भविष्याचा विचार करून अशा लेआउट मध्ये उपलब्ध सोई सुविधाची खातरजमा करूनच प्लॉट घ्यायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या व्यवहारात सक्रिय सहभागी असलेल्या दलालांची मार्केट व्हॅल्यू काय याचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा नभाआड झालेल्या “त्या दलाल “समान अनेक दलाल पळवाटीने आपल्या मेहनतीची कमाई घेऊन पोबारा करू शकतात.यात तिळमात्र शंका नाही. लेआउट धारक मालकांची लेआउट डेव्हलपमेंट ची भूमिका कमालीची उदासीन आहे. सहज प्राप्त होत असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच त्यांच्याकडून प्राप्त होत असलेल्या टोकन अमाऊंटच्या कोट्यावधी रुपयाच्या रकमेवर आपली मार्केट व्हॅल्यू वाढवत शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम परिसरातील लेआउट धारक अधिकारी त्याला पुढार्यांना हाताशी धरून करीत आहेत.
दरवर्षी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून सर्वत्र जाहिरात करीत असते जागो ग्राहक जागो या मथळ्याखाली अनेक शासकीय योजना, जमीन घोटाळे, याबाबत जनजागृती करीत असते. परंतु आपला काळा पैसा बाजारामध्ये सक्रिय करण्यासाठी हपापलेल्या अनेक धनाड्य लोकांमुळे आगामी काळात शहराचे विद्रूपीकरण होऊन, कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवला जातो. याला सर्व स्वीकारणीभूत डोळे मिटून आपल्या हक्क आणि मेहनतीची कमाई अशा दलाल तथा लेआउटधारकांवर विश्वास ठेवत निमूट पणे त्यांना देऊन टाकतात. दैनंदिन वर्तमानपत्र तथा टेलिव्हिजनवर प्रसारित होत असलेल्या विविध घोटाळा मथळ्याखाली प्रकाशित होत असलेल्या बातम्यांचा सुद्धा अशा सुज्ञ नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही ही खेदजनक बाब आहे. अशा नियमबाह्य लेआउट वर नियमानुसार कारवाई न झाल्यास भविष्यकाळात अनेक वस्त्या तयार होऊन तेथे नगरपरिषद मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधाना पन्नास वर्षापेक्षा जास्त विलंब लागण्या खेरीज राहणार नाही. तेव्हा लाखो रुपये खर्च करून मागासलेली कॉलनी उभारण्यात कुठला शहाणपण आहे..? हा प्रश्न अनायाशी उपस्थित होतो. लेआउट धारकांनी पळवाट ग्राह्य धरून निर्माण केलेल्या अशा लेआउट मध्ये रस्ते,नाल्या, विद्युत च्या दर्जा कुठल्याही दर्जात बसत नाही. आगामी पावसाळ्यात अशा लेआउट चे तीन तेरा वाजल्या शिवाय राहणार नाहीत. हे मात्र खरे.
ग्राहकांच्या जनजागृतीसाठी विशेष माहिती…
प्लॉट खरेदी करण्यापूर्वी जमिनीचा वापर कसा करायचा आहे हे पक्के केल्यास प्लॉटचा शोध घेणं सोपं जातं. मंजूर आराखडा म्हणजेच अप्रूव्हल लेआउट विकास आराखडा म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅन यांचा अभ्यास करूनच आपल्या प्लॉटचा स्थान नक्की करावं. बहुतेक नगरपालिकांच्या हद्दी त निवासी क्षेत्रातील प्लॉट जर बारा फूट किंवा त्यापेक्षा अधिक रुंदी रस्त्याच्या लागून असेल तर प्लॉटवरील इमारतीच्या तळमजल्याचा वापर दुकानांसाठी करता येतो. रस्त्याची रुंदी त्यापेक्षा कमी असेल तर प्लॉटवर फक्त निवासी विकास करता येतो. अशावेळी करावयाच्या जमिनीचा वापर आणि विकास आराखडा यांचा अभ्यास न करता खरेदी केलेला प्लॉट नुकसानी टाकु शकतो. प्लॉट विकत घेताना स्थानिक नगरपालिका व महानगरपालिका यांच्या प्रचलित नियमावलीचा नीट अभ्यास करणे आवश्यक आहे.
प्लॉटच्या वापराचे प्रकार….
फक्त निवासी रेसिडेंटल
धंद्यासाठी व निवासासाठी कमर्शियल अँड रेसिडेंटल, औद्योगिक
करमणुकीसाठी, शैक्षणिक, धार्मिक स्थळे,क्रीडाक्षेत्र, खुली जागा
प्लॉटचा आकार
मंजूर आराखड्यात सर्वसाधारणपणे चौरस आयताकृती गोमुखी व्याघ्रमुखी असे चार आकारमानातील भूखंड विकासासाठी उपलब्ध असतात म्हणून या प्लॉटची शक्यतो निवड टाळावी. जेव्हा घर बांधण्यासाठी एखादा प्लॉट पाहिला जातो तेव्हा त्यावर आपल्याला वास्तू उभी करावी लागते तिथे सुख समृद्धी मिळावी असे प्रत्येकाला वाटतं एखाद्या जागेत माणसं राहतात यावरही या जागेचे शुभाशु परिणाम अवलंबून असतात त्यामुळे खाली दिलेल्या लोकांपैकी कोणाचाही प्लॉट खरेदी करताना पुनर्विचार करावा..
ओबडधोबड असलेली जमीन, देश सोडून गेलेली व्यक्ती, त्या जागेत कवट्या हाड सांगाडे असतील ती
खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने दैनिक खोजमास्टरच्या लेआउट गोड बंगाल मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये आपण ग्राहकांच्या जनजागृतीचा प्रयत्न करीत आहोत. लेआउट संदर्भात कोणत्याही तक्रारी फसवणूक झाली असल्यास आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता
9657451596
जागो ग्राहक जागो…
Users Today : 18