सतीश मवाळ
मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील आदर्श व प्रयोगनिष्ठ शेतकरी उल्हास रामकृष्ण लहाने पाटील यांनी आपल्या निशान्त नामक मुलाच्या शासकीय नोकरीत नियुक्तीचे आनंदाचे क्षण अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकवून त्यांच्या हक्काच्या घरासाठी हिवरा आश्रम येथील नित्यानंद सेवा प्रकल्पला तब्बल 51000(एक्का वन हजार )रुपये आर्थिक मदत करून समाजासामोरं अनुकरणीय आदर्श ठेवला आहे.
उल्हास पाटील यांच्या निशांत नामक इंजिनीअर मुलाचे स्पर्धा परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात जलसंपदा विभागात सिविल इंजिनीअर म्हणून नुकतीच निवड झाली आहे. हे परमोच आनंदाचे क्षण केवळ स्वतः पुरते मर्यादित न ठेवता, तो आनंद अनाथ मुलांच्या डोक्यावर दातृत्वाची घनगर्द सावली धरून साजरा करण्याचा कृतिशील संकल्प त्यांनी सिद्धीस नेला.
कुठल्याही शासकीय अनुदानशिवाय चालणाऱ्या नित्यानंद प्रकल्पच्या ह्या समाजकार्याला हातभार लावण्यासाठी त्यानी प्रकल्प संचालक अनंत शेळके यांच्याकडे रुपये 51000(एक्कावण हजार )धनादेश सुपूर्द केला. ह्या वेळी समाजाभिमुख मंडळं अधिकारी राजेंद्र आव्हाळे, भाऊ सतीश लहाने, कविताताई लहाने, उर्मिलाताई लहाने, सविताताई आव्हाळे उपस्थित होत्या.
स्पर्धेच्या युगात शासकीय नोकरीं मिळणे म्हणजे उत्तुंग उपलब्धी समजली जाते.एकीकडे अशी आनंदाची पर्वनी मोठमोठ्या उत्सवाचे स्वरूप देऊन मेजवाण्या आयोजित करून साजरी करण्याची नवी संस्कृती फोफावत असतांना, त्या परम्परेला छेद देऊन कुठलंच सेलेब्रेशन न करता अनाठायी खर्च टाळून एक अनुकरणीय पाऊल उल्हास पाटील यांनी समाजासामोरं ठेवलं आहे.
गोरगरीब व तळागाळातील मुलांना मदत करण्यासाठी सदैव धडधड करणारे एक चालते बोलते विद्यापीठ म्हणून लौकिक असलेले लव्हाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. रामकृष्ण नारायण लहाने (राना गुरुजी )यांच्या दा्तृत्वाचा वसा आणि वारसा त्यांचे सुपुत्र उल्हास लहाने चालवत सामाजिक बांधिलकीचा सुवर्णं अध्याय रचत आहेत.
“शिक्षण हे समाजपरिवर्तनचे प्रभावी माध्यम आहे, वंचीत मुलांना दर्जेदार सुविधा मिळून त्यांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा. शिक्षणापासून कुणीही वंचीत राहु नये.”अशी वडिलांची शिकवण होती. आपल्यावर समाजऋण आहे ते आपण फेडले पाहिजे. अशी भावना उल्हास लहाने यांनी व्यक्त केली.
Users Today : 19