जखम डोक्याला आणि उपचार गुडघ्याला रेती चोरी प्रकरणात दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तलाठ्यावर थातूरमातूर कारवाई

Khozmaster
4 Min Read

विभागीय आयुक्त यांचे कडक कारवाईचे आश्वासन

देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित 

खडकपूर्णा नदी पात्रातून देऊळगांवराजा हजारो ब्रास अवैध रेती उत्खनना बाबत वारंवार तक्रारी करूनही थातूरमातुर चौकशी करून चुकीचा अहवाल सादर करून कनिष्ठ श्रेणीचा दर्जा असलेल्या अधिकारी यांना तात्पुरते निलंबित करून उच्च दर्जा असलेल्या अधिकारी यांना पाठीशी घालून सदहूं भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. विरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी मोर्चे निवेदने उपोषण देखील केले आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही महसूल विभाग मात्र थातूरमातूर कारवाई करत आहे या विरोधात कडककारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी नुकतीच अमरावती येथील महसूल विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन दिला आहे

 

याबाबत डॉ शशिकांत खेडेकर यांनी सांगितले की,जो भ्रष्टाचार झाला आहे त्यामध्ये उच्च दर्जाचे अधिकारी सुद्धा जबाबदार आहे. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आश्चर्य म्हणजे जे उच्च दर्जाचे अधिकारी दोषी आहेत, ज्यांची अवैध उत्खनन थांबविण्याची जबाबदारी होती त्यांनीच या प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल सादर करणे हे कितपत योग्य आहे. यामध्ये जे तलाठी, मंडळ अधिकारी संबंधित आहे त्यांचे सुद्धा बयान घेणे आवश्यक आहे ते घेण्यात यावे तसेच मूळ तक्रार कर्ते अनिल चित्ते, शिवसेना तालुकाप्रमुख यांना चौकशी अहवाल तयार करत असतांना विश्वासात घेवून त्यांनी तक्रारीत नमूद मुद्द्यावर बयान घेणे आवश्यक होते.

तसेच गेल्या तीन वर्षापासून देऊळगावराजा व सिंदखेडराजा नदीपात्रातून जे अवैध रेती उत्खनन झालेले आहे तसेच ज्या घाटाचे लिलाव झालेले आहेत त्या ठिकाणी जेसीबी व पोकलँडद्वारे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. या अवैध उत्खननाचे जी.पी.एस. फुटेज देखील आपणास सादर केले आहेत. सदहूं ठिकाणी कोणतेही सी.सी.टी.व्ही लावण्यात आले नाही, हद्दी निच्छित केल्या गेल्या नाही. तसेच नदीपात्रात केटी वेअर चे पाणी असतांना त्याठिकाणी लिलाव केले गेले व बोटी द्वारे रेतीचा अवैध उपसा केला गेला.

-लिलाव झालेल्या रेती घाटावर कोणत्याच अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने भेटी देलेली नोंद सुद्धा संबंधित कार्यालयाकडे नाही हे सर्व माहिती अधिकारामध्ये ही माहिती संबंधित तहसील कार्यालयास मागितली असता त्यांनी याप्रकारची कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे पत्र सादर केले आहे. याप्रकरणी आपल्या स्तरावर सखोल चौकशी व्हावी. म्हणजेच या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल

मार्च २०२३ मध्ये खडकपूर्णा नदी मध्ये जे अवैध उत्खनन झाले त्यामुळे जे मोठ-मोठे खड्डे नदीमध्ये पडले होते त्यांचे त्वरित मोजमाप करूनच नदीच्या पात्रात पाणी सोडावे अशी मागणी होती. नदीच्या पात्रात पाणी सोडण्यासाठी कोणाचाही विरोध नव्हता किंवा नाही. परंतु सदर मागणीचा विचार न करता अवैध रेतीच्या उत्खननाचे कोणतेही मोजमाप न करता एप्रिल २०२३ च्या शेवटी शेवटी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. व झालेले अवैध उत्खनन लपविण्यात आले.

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध उत्खनना बाबत एवढ्या तक्रारी करूनही आजही शेकडो गाड्यांमधून हजारो ब्रास रेतीचे उत्खनन सुरुच आहे. रोज शेकडो गाड्यांची, ज्यावर बहुतांश गाड्यांवर नंबर प्लेट सुद्धा नाही, अश्या गाड्यांमार्फत सुद्धा अवैध वाहतुक सुरूच आहे. ही अवैध वाहतूक जिल्ह्यातील विविध विभागातील संबंधित पोलीस प्रशासन, वाहूतक विभाग, महसूल प्रशासनाच्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना तर सोडाच परंतु उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिसत नाही याचेच आश्चर्य वाटते. त्यामुळे संबंध जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये याची चर्चा आहे. सर्वच प्रशासन यंत्रणा यामध्ये सामील आहे अशी शंका आहे.

 

त्यामुळे आजही जे अवैध रेती उत्खनन सुरु आहे ते थांबवण्यात यावे. तसेच अवैध रेतीचे साठे जप्त करून त्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.

या भ्रष्टाचारा बाबत राज्यस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी अहवाल घ्यावा व संबंधित सर्वच अधिकारी, रेती माफिया यांच्यावर कडक कार्यवाही करून लाखो करोडो रुपयांचा झालेला बुडालेला महसूल वसूल – करावा.

 अन्यथा सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *