महिला लोकशाही दिनाचे 15 मे रोजी आयोजन

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार – : महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 15 मे, 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 10.30 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित राहून सादर करावे. असे राजेंद्र बिरारी, सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *